शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सीबीआयला चौकशीची दिलेली संमती मागे घेण्याचा केरळ सरकारचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:18 IST

Kerala News : इतर राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सीबीआयला  राज्यात चौकशीसाठी दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेण्याचा सतारूढ डाव्या लोकशाही आघाडी सरकारचा विचार आहे.  

तिरुवनंतपुरम -  सीबीआयला  राज्यात चौकशीसाठी देण्यात आलेली संमती मागे घेण्याचा केरळ सरकार विचार करीत आहे. राज्य सरकारचा हा प्रस्ताव  म्हणजे भ्रष्टाचार दडपण्याचा प्रकार आहे, असा आरोप काँग्रेस आणि भाजप या विरोधी पक्षांनी केला आहे. इतर राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सीबीआयला  राज्यात चौकशीसाठी दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेण्याचा सतारूढ डाव्या लोकशाही आघाडी सरकारचा विचार आहे.  

 तथापि, विरोधी पक्षनेते  रामेश चेन्निथाला यांनी असा आरोप केला की, लाईफ  मिशन स्कीममधील भ्रष्टाचारावर  पांघरुण घालण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.  तो  आत्मघाती आहे. 

केरळचे कायदामंत्री आणि सीपीआय-एमचे  वरिष्ठ नेते ए. के. बालन यांनी  सांगितले की, अनेक राज्यांनी सीबीआयला  चौकशीसाठी दिलेली संमती मागे घेतली आहे.  सीपीआय-एम आणि सीपीआयने  मागणी केल्यानुसार केरळही ही संमती मागे घेण्याबाबत विचार करीत आहे. सीबीआयची विश्वासार्हता  होती, तेव्हा ही संमती देण्यात आली होती. अधिकारात  नसलेल्या प्रकरणात सीबीआय आता ढवळाढवळ करीत आहे. सीबीआयच्या अधिकारांबाबत आम्हाला आक्षेप नाही. सीबीआयला चौकशीसाठी दिलेली संमती चौकशीसाठी दिलली संमती अनेक राज्यांनी मागे घेतली आहे. केरळ सरकारकडेही आता हा पर्याय आहे.लाईफ मिशनने विदेशी चलन नियमन (ए्सीआरए) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे  आमदार अनिल अक्कारा यांनी दिलेल्या  तक्रारीवरून सीबीआय या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता.लाईफ मिशन स्थानिक स्वराज्य विभागांतर्गत येते आहे. सीबीआयच्या  एफआयआरला  हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. म्हणूनचसुरुवातीला हायकोर्टाने  सीबीआय चौकशीला  स्थगिती दिली होती. सीपीआयचे प्रदेश सचिव कनाम राजेंद्र यांनी सांगितले की,  सीबीआयला आमचा विरोध नाही; परंतु सीबीआयने राज्याच्या संमतीनेच प्रकरणे हाताळली पाहिजेत. पकरण हाती घतली पाचहजत.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागKeralaकेरळPoliticsराजकारण