ऑनलाइन लोकमत -
केरळ, दि. २८ - पुलपट्ट जिल्ह्यात पिसाळलेल्या हत्तीने हैदोस घालत गाड्यांची तोडफोड केली आहे. पुलपट्ट जिल्ह्यातल्या कोंगड गावातील ही घटना आहे. २५ फेब्रुवारीची ही घटना असून सोशल मिडियावर याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या हत्तीचं नाव देवीदासन आहे. त्याला पुलपट्टमधील मंदिरातील महोत्सवासाठी आणण्यातं आलं होतं. मात्र हत्तीने यावेळी थैमान घालत रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचा अक्षरक्ष चुराडा करुन टाकला. हत्तीवर माहुतदेखील बसले होते मात्र त्यांनादेखील हत्तीला आवरता आलं नाही. टेम्पोचा तर हत्तीने पुर्ण चेंदामेंदाच करुन टाकला आहे.
केरळमध्ये धार्मिक महोत्सवांमध्ये हत्तींचा वापर करण्यावरुन वादविवाद सुरु आहेत. प्राणीमित्र गेली अनेक वर्ष सुरु असलेल्या या प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पॅमेला अँडरसनने देखील केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून थ्रिसूर महोत्सवात हत्तींचा वापर न करण्यासाठी पाऊल उचलण्याची विनंती केली होती.