शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव केरळ विधानसभेत संमत; भाजपच्या आमदारानेही दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 12:37 AM

भाजपच्या आमदारानेही दिला पाठिंबा

कोची : नवीन कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी करणारा एक प्रस्ताव केरळ विधानसभेतील १४० आमदारांनी गुरुवारी एकमताने संमत केला आहे. विशेष म्हणजे, या राज्यातील भाजपचे एकमेव विधानसभा आमदार ओ. राजगोपाल यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला धक्का आहे.

नव्या कृषी कायद्याची देशभरात सप्टेंबरमध्ये अंमलबजावणी झाली. या कायद्यांविरोधात शेतकरी करीत असलेल्या आंदोलनाला केरळ विधानसभेने संमत केलेल्या प्रस्तावामुळे आणखी बळकटी मिळाली आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विधानसभेत हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाच्या विरोधात भाजपचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी विधानसभेत जोरदार भाषण केले होते. मात्र, स्वत:चे मत त्यांनी प्रस्तावाच्या पारड्यात टाकले. (वृत्तसंस्था) 

डोळे वटारताच भूमिका बदलली

भाजप आमदार ओ. राजगोपाल यांनी सांगितले की, नव्या कृषी कायद्याविरोधात केरळ विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावाला मी लोकशाहीची बूज राखत सभागृहात पाठिंबा दिला. मात्र, या प्रस्तावात वापरलेल्या काही शब्दांबाबत तीव्र आक्षेप असून, तो मी विधानसभेतील भाषणात मांडला आहे. मात्र, प्रस्ताव संमत झाल्यानंतर केरळ भाजपने डोळे वटारताच आमदार ओ. राजगोपाल यांनी नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत, असे विधान सभागृहाबाहेर केले. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारKeralaकेरळ