तिरुवनंतपुरम - काँग्रेसचे नेते व केरळच्या तिरुवनंतपुरम या मतदारसंघातील विद्यमान खासदार शशी थरूर यांच्याकडे ५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्याकडे मारुती सिएझ, मारूती एक्सएल ६ अशा दोन कार आहेत. थरुर तिरुवनंतपुरममधून सलग तीनदा निवडून आले आहेत.
अशी वाढली संपत्ती२०१४————————२३ कोटी रुपये२०१९————————३५ कोटी रुपये२०२४————————५५ कोटी रुपये- १९ बँक खात्यांमध्ये असलेल्या ठेवी तसेच रोखे, डिबेंचर, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केलेली असून बहरीन आणि अमेरिकेतील बँकांमध्ये त्यांची खाती आहेत.- ४.३२ कोटी रुपये २०२२-२०२३ या वर्षात उत्पन्न होते. - ४९ कोटी रुपयांपेक्षा अधिक जंगम मालमत्ता आहे. - ५३४ ग्रॅम सोने.- ३६ हजार रुपये रोख. - ६.७५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची स्थावर मालमत्ता. - १०.४७ एकर शेतजमीन. किंमत ६.२० काेटी रुपये. - ५२ लाख रुपये किमतीचे तिरुवअनंतपुरम येथे निवासस्थान.- १६.४९ लाख रुपयांचे कर्ज.
देशभरात नऊ एफआयआर दाखलकाँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर देशभरात विविध प्रकरणांत नऊ एफआयआर दाखल आहेत. त्यातील बहुतांश एफआयआर हे विविध गटांत शत्रुत्व निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल नोंदविण्यात आले होते.