मयुरेश वाटवेपलक्कड : केरळमधील सर्वात उष्ण भाग म्हणून पलक्कड ओळखला जाताे. अतिउष्णतेसाठीच तो परिचित आहे. मात्र यंदा तापलेल्या राजकीय वातावरणानेही यात भर घातली आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार व्ही. के. श्रीकंदन यांना एलडीएफचे ए. विजयराघवन आणि भाजपचे सी. कृष्णकुमार टक्कर देत आहेत.
या मतदारसंघातील भाजपच्या वाढत्या बळाने ही निवडणूक तिरंगी बनवली आहे. केरळमधील भाजपच्यचे जे ‘हॉटस्पॉट’ आहेत त्यात पलक्कडचा समावेश होतो. केरळमध्ये भाजप गेली अनेक वर्षे काम करत आहे. आपली मते आणि मतांची टक्केवारी पक्षाने सातत्याने वाढवत नेली आहे. पलक्कड पालिकेवर तर भाजपचीच सत्ता आहे. तिरंगी लढतीचा लाभ भाजपला होईल असा पक्षाचा अंदाज आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्देकेंद्राने गरीब व वंचितांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?जागावाटप ठरलेले नसल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील काॅंग्रेस आणि माकप एकमेकांविराेधात उभे.या मतदारसंघात पाणीप्रश्न गेल्या काही वर्षांत ऐरणीवर आला आहे. पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव, हादेखील एक प्रमुख मुद्दा आहे.