Kerala Lottery Winner: 'भगवान जब देता है छप्पर फाड़ के देता है', ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरली आहे, केरळमधील एका ऑटो चालकाच्या बाबतीत. केरळमधील एका ऑटो चालकाला लॉटरी (Lottery) लागली आहे. या ऑटो चालकाने 12 कोटींची बंपर लॉटरी जिंकली आहे. ओणम बंपर लॉटरीचा (Onam Bumper Lottery) निकाल जाहीर झाल्यानंतर एक दिवसानंतर विजेत्याची ओळख ऑटो चालक म्हणून झाली आहे. लॉटरी जिंकल्यानंतर ऑटो चालकाच्या आनंदाला सीमा नव्हती. (autodriver wins rs 12 crore in onam lottery)
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या (Lottery Winner) ऑटो चालकाचे (Autodriver)नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे. जयपालन पी आर यांनी फॅन्सी लॉटरीच्या तिकिटांद्वारे इतकी मोठी रक्कम जिंकली आहे. जयपालन पी आर हे मूळचे कोचीजवळील मराडूतील रहिवाशी आहेत. ओणम नंतर दुसऱ्या दिवशी लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले, ज्यात जयपालन पी आर यांनी लॉटरी जिंकली.
रविवारी जाहीर झालेल्या निकालाच्या विजेत्याचा लॉटरी तिकीट क्रमांक TE 645465 आहे. लॉटरी जिंकल्यानंतर जयपालन पी आर यांनी पत्रकारांना सांगितले, "मी 10 सप्टेंबर रोजी त्रिपुनीथुरा (Tripunithura)येथून हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मला समजले की हा एक फॅन्सी नंबर (Fancy Number) आहे." रिपोर्टनुसार, ऑटो चालक जयपालन पी आर यांना 12 कोटींच्या लॉटरीमधून कर भरल्यानंतर 7 कोटी रुपये मिळतील.
केरळ लॉटरीच्या तिरुवोनम बंपर लॉटरी निकालाचा निकाल रविवारी गोरकी भवन, तिरुअनंतपुरम येथे लागला. केरळ राज्य लॉटरी संचालनालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार राज्याचे अर्थमंत्री के.एन. बालागोपाल यांनी सोडतीचे उद्घाटन केले. राज्याचे परिवहन मंत्री अँटनी राजू अध्यक्षस्थानी होते. या दरम्यान ओणम बंपर लॉटरीचा निकाल राज्यभरात विकल्या गेलेल्या 54 लाख तिकिटांसाठी जाहीर झाला.