धक्कादायक! परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने वडिलांची मुलाला कुदळीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:08 PM2019-05-08T16:08:16+5:302019-05-08T16:20:11+5:30

परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने एका वडिलांनी मुलाला कुदळीने मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलाचा पाय तूटला आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

kerala man hits son with spade handle for failing to score a plus arrested | धक्कादायक! परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने वडिलांची मुलाला कुदळीने मारहाण

धक्कादायक! परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने वडिलांची मुलाला कुदळीने मारहाण

Next
ठळक मुद्देपरीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने एका वडिलांनी मुलाला कुदळीने मारहाण केली आहे.मारहाणीत मुलाचा पाय तूटला आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. केरळमधील किलिमनूर येथे मंगळवारी (7 मे) परिक्षेत सर्व विषयात  'ए प्लस' न मिळवल्याने वडिलांनी मुलाला मारहाण केली.

कोच्ची - देशामध्ये वार्षिक परिक्षेचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र काही मुलं या परिक्षेत थोडी मागे पडली म्हणजेच त्यांना कमी गुण मिळाले. अनेकदा मुलांना कमी गुण मिळाल्याने पालक नाराज होतात तसेच मुलांना ओरडतात. मात्र केरळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेत 'ए प्लस' न मिळाल्याने एका वडिलांनी मुलाला कुदळीने मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलाचा पाय तूटला आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनीअटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील किलिमनूर येथे मंगळवारी (7 मे) परिक्षेत सर्व विषयात  'ए प्लस' न मिळवल्याने वडिलांनी मुलाला मारहाण केली. कुदळीने केलेल्या मारहाणीत मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याचा पाय तूटला आहे. केरळमध्ये सोमवारी (6 मे) SSLC बोर्डाचे म्हणजेच दहावीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्व विषयात ‘ए-प्लस’ न मिळवल्याने वडील संतापले आणि त्यांनी मुलाला मारहाण केली. 

साबू (43) असे कुदळीने मारहाण करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. किलिमनूर गावात साबू पत्नी व मुलांसोबत राहतो. साबू व त्याची पत्नी शेतमजूर आहेत. पण हे कष्ट मुलाच्या नशिबात नये म्हणून साबुने त्याला चांगल्या शाळेत टाकले होते. मुलाने खूप शिकून मोठं व्हावं अशी त्याची इच्छा होती. पण मुलगा दरवर्षी जेमतेमचं गुण मिळवत होता. तसेच नेहमी कमी गुण मिळवून पास होत होता. त्यामुळे यावेळी साबुने त्याला चांगले गुण मिळवण्याची ताकीद दिली होती. मात्र मुलाला परिक्षेत ए प्लस मिळाला नाही. त्यामुळे त्याने रागाच्या भरात कुदळीने मुलाला मारहाण केली. यामध्ये मुलाचा पाय तूटला. 

साबुच्या पत्नीने याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी साबू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेनंतर साबू फरार झाला होता. पोलिसांनी फरार साबूला मंगळवारी अटक केली. साबुला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 

 

Web Title: kerala man hits son with spade handle for failing to score a plus arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.