केरळमध्ये कोट्टयाम जिल्ह्यातील एका गावात सध्या चिंता आणि भीतीचं वातावरण आहे. येथील लोकांना जमिनीतून चित्रविचित्र आवाज ऐकू येत आहेत. हा प्रकार कोट्टयममधील चेनाप्पडी गावात घडत आहे. येथील लोकांनी सांगितले की, त्यांना शुक्रवारी सकाळी दोन वेळा मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला गाव आणि त्याच्या आसपास याच प्रकारचे आवाज ऐकू आले.
ग्रामस्थांनी सांगितले की, आसपासच्या वातावरणामध्ये कुठलाही बदल झालेला दिसत नाही आहे. आता केवळ शास्त्रीय अभ्यासामधूनच जमिनीच्या खालून अशा प्रकारचे आवाज येण्यामागे काय कारण आहे, हे समजून घेता येईल. केरळमधील खाणकाम आणि भूविज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या तज्ज्ञांचं पथक लवकरच परिसराची पाहणी करणार आहे. विभागाच्या एका सूत्राने सांगितले की, जेव्हा या आठवड्याच्या सुरुवातीला आवाज ऐकू आले होते. त्यांनी तेव्हा परिसराची पाहणी केली होती.
ग्रामस्थांनी सांगितले की, आसपासच्या वातावरणात कुठलाही बदल दिसून आला नाही. तसेच केवळ शास्त्रीय अभ्यासातून जमिनीच्या खाली अशाप्रकारचे आवाज का येत आहेत, हे समोर येणार आहे. केरळमधील खाणकाम आणि भूविज्ञान अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या तज्ज्ञांचं पथक लवकरच परिसराची पाहणी करणार आहे. विभागातील एका सूत्राने सांगितले की, जेव्हा आठवड्याच्या सुरुवातील आवाज ऐकू येत होते. त्यांनी तेव्हा परिसराची पाहणी केली होती.