दोन दिवसांपासून खोल दरीत अडकलेल्या तरुणाची लष्कराच्या बचाव पथकाने केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:08 PM2022-02-09T12:08:00+5:302022-02-09T12:08:59+5:30
आर बाबू नावाचा वीस वर्षीय तरुण मलमपुझा डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेला होता. यादरम्यान त्याचा तोल जाऊन तो खोल दरीत अडकला.
तिरुअनंतपूर:केरळ(Kerala) मधील पलक्कड भागातील मलमपुझा डोंगरावर गेल्या दोन दिवसांपासून अडकलेल्या तरुणाची लष्कराने सुटका केली आहे. सोमवारपासून अडकलेल्या या तरुणाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते, मात्र या रेस्क्यू टीम त्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या तरुणाला वाचवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आर बाबू (R Babu) नावाचा वीस वर्षीय तरुण सोमवारपासून पलक्कड भागातील मलमपुझा डोंगरावर अडकला होता. तरुण खोल दरीत अडकल्याची माहिती मिळताच, बचाव टीम त्याला वाचवण्यासाठी गेले. पण, बाबू जिथे अडकला होता, तिथे जाणे अतिशय कठीण होते. गेल्या दोन दिवसांपासून बाबून डोंगरावरील एका छोट्याशा खड्ड्यात आपला जीव मुठीत धरुन बसला होता.
Efforts are in full swing to rescue the youth trapped in #Malampuzha Cherat hill. There are currently two units of the @adgpi at the scene. Army members were able to talk to him. The rescue operation will be intensified today. @IAF_MCC helicopter is ready to be deployed.
— Pinarayi Vijayan (@vijayanpinarayi) February 9, 2022
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
तो अडकल्याचा एका व्हिडिओमध्ये माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला, ज्यात आर बाबू टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसत आहे. तसेच, तो धोकादायक स्थितीत एका खड्यात बसलेला दिसतोय. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज सकाळी ट्विट करून लष्कराच्या बचाव पथकाला तरुणाशी बोलण्यात यश आल्याचे सांगितले होते. त्यानंतर बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नाने त्या तरुणाला वाचवले.
तरुण दरीत कसा अडकला ?
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आर बाबू आपल्या दोन मित्रांसह चेराड टेकडीच्या माथ्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. पण, टेकडी खूप उंच असल्यामुळे दोघे अर्ध्या रस्त्यानेच परतले. पण बाबू शिखर चढत राहिला. डोंगर माथ्यावर पोहोचल्यानंतर बाबूचा पाय घसरला आणि तो डोंगराच्या बाजूला असलेल्या दरीत अडकला.