Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:27 AM2021-08-27T10:27:47+5:302021-08-27T10:28:17+5:30

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला.

In Kerala, number of corona patients has increased by 58 per cent after Onam pdc | Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन

Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन

Next

- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कोरोना महामारी रोखण्यासाठीच्या उपायांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सणासुदीच्या महिन्यांत कठोरपणे पालन करून घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना गुरुवारी दिले. कोविड-१९ ची दुसरी लाट अजून विरलेली नाही आणि प्रत्येक सणानंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसले आहे, असे केंद्राने म्हटले.
देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत केरळचा ओणम महोत्सवानंतरचा वाटा हा ५८.४ टक्के आहे. ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत १० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. एवढेच काय महाराष्ट्रातही रुग्णसंख्या घटली असून तेथे उपचाराधीन रुग्ण १६ टक्के, कर्नाटकमध्ये ५.५८, तमिळनाडूत ५.५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४.२१ टक्के आहेत.  देशात गुरुवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ४६,१६४ नोंदली गेली. त्यात केरळचा वाटा मोठा आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला. कोणत्याही परिस्थितीत सणासुदीच्या दिवसांत कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जास्तीची काळजी घ्या, उपाय योजा, अशा शब्दांत केंद्र सरकारने राज्यांना सावध केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुरेशी उपाययोजना केली आहे का, असे विचारल्यावर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे.”

बहुसंख्य भारतीयांना लसींनंतर दुष्परिणाम नाहीत : पाहणीचा निष्कर्ष
n    देशात ६० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लस दिली गेली असून त्यातील बहुसंख्य जणांना त्यानंतर कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) जाणवला नाही किंवा जाणवला असेल तर तो अगदी सौम्य होता. 
n    यावर्षी १६ जानेवारीपासून देशभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांच्या अनुभवांची पाहणी करून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
n    सौम्य दुष्परिणाम जाणवले ते कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा टोचून घेतल्यानंतरच्या २४-४८ तासांत आणि फक्त एक टक्का लोकांना कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर कोविड-१९ ची बाधा झाली. या तक्रारी होत्या थकवा, हात दुखणे आणि ताप येण्याच्या. कोव्हॅक्सिन लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ३० टक्के जणांना ताप आला तर एक टक्के लोकांना तापाशिवाय गंभीर तक्रार होती.

n    ही पाहणी ‘लोकल सर्कल्स’ या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केली. त्यात कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांतील ७० टक्के जणांना आणि कोविशिल्डची दुसरीही मात्रा घेतलेल्यांपैकी ७५ टक्के जणांना कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.
n    कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ६४ टक्के जणांना आणि याच लसीची दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी ७८ टक्के जणांना अजिबात दुष्परिणाम जाणवला नाही किंवा जाणवला असल्यास तो अगदीच सौम्य होता.

Web Title: In Kerala, number of corona patients has increased by 58 per cent after Onam pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.