नन बलात्कार प्रकरण : आरोपी बिशपला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 03:25 PM2018-09-22T15:25:18+5:302018-09-22T15:29:42+5:30
ननवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला 24 सप्टेंबरपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांनी शुक्रवारी बिशप फ्रँको मुलक्कलला अटक केली होती.
केरळ : ननवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला 24 सप्टेंबरपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी केरळ पोलिसांनी शुक्रवारी बिशप फ्रँको मुलक्कलला अटक केली होती.
2014 ते 2016 या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा बिशप फ्रँको मुलक्कलवर आरोप आहे. गेल्या दोन दिवसांपासून फ्रँको मुलक्कलची कसून चौकशी सुरु होती. ननवरील बलात्कार प्रकरणात अटक झालेले फ्रँको मुलक्कल भारतातील पहिले बिशप आहेत. दरम्यान, आज फ्रँको मुलक्कलला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने फ्रँको मुलक्कलचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच, कोर्टाने फ्रँको मुलक्कलला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Kerala nun rape case: Former Bishop of Jalandhar, Franco Mulakkal, sent to police custody till 24 September. His bail application has been dismissed. pic.twitter.com/EDbtCyr3XN
— ANI (@ANI) September 22, 2018
बिशप फ्रॅंको मुलक्कलची व्हॅटिकनने जालंधरमध्ये नियुक्ती केली होती. केरळच्या अधिकृत दौऱ्यावर असताना ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बिशप फ्रॅंको मुलक्कल यांना व्हॅटिकनने गुरुवारी प्रमुखपदावरुन हटवले. दरम्यान, बिशम फ्रॅंको मुलक्कल यांनी व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती. यामागे त्यांनी खटल्याचा हवाला दिला होता. त्यांनी पत्रात लिहीले होते की, आपल्याविरोधात काही आरोपांची चौकशी सुरु आहे, पोलिसांच्या या चौकशीला सहकार्य देण्यासाठी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे.
#WATCH Former Bishop of Jalandhar, Franco Mulakkal, being taken into police custody, at magistrate court in #Kerala's Kottayam. pic.twitter.com/GkbMiQKov1
— ANI (@ANI) September 22, 2018