केरळ नन बलात्कार प्रकरण : मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:44 PM2018-10-22T13:44:00+5:302018-10-22T13:47:02+5:30
Kerala nun rape case: नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा सोमवारी पंजाबमधील जालंधरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.
जालंधर : नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा सोमवारी पंजाबमधील जालंधरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.
केरळमधील ननवरील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलच्या विरोधात फादर कुरियाकोर मुख्य साक्षीदार होते. त्यांचा मृतदेह जालंधर येथील दसुयातील सेंट. मेरी चर्चमध्ये सापडला. दरम्यान, फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे व्यक्त करण्यात येत आहे. बिशप फ्रँको मुलक्कलच्या विरोधात साक्ष दिल्यामुळे फादर कुरियाकोस कट्टूथारा यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांचे भाऊ जोस कट्टूथारा यांनी केला आहे.
Kerala nun rape case: Father Kuriakose Kattuthara, a key witness in the rape case against Bishop Franco Mulakkal, found dead in Punjab's Jalandhar today. More details awaited. pic.twitter.com/GiwVagmSkJ
— ANI (@ANI) October 22, 2018
2014 ते 2016 या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा बिशप फ्रँको मुलक्कलवर आरोप आहे. ननवरील बलात्कार प्रकरणात अटक झालेले फ्रँको मुलक्कल भारतातील पहिले बिशप आहेत. याप्रकरणी फ्रँको मुलक्कलला कोर्टाने दोन आठवड्यांची न्यायालयीन चौकशी सुनावली आहे.
It was found that he vomited over the bed. Blood pressure tablets were found at the spot. Investigation is underway. In our notice, no security was provided to him: AR Sharma, DSP Dasuya, on Father Kuriakose Kattuthara, witness in Kerala nun rape case, found dead pic.twitter.com/wot6nzxRwU
— ANI (@ANI) October 22, 2018
बिशप फ्रँको मुलक्कलची व्हॅटिकनने जालंधरमध्ये नियुक्ती केली होती. केरळच्या अधिकृत दौऱ्यावर असताना वर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बिशपफ्रँको मुलक्कला व्हॅटिकनने प्रमुखपदावरुन हटवले आहे. दरम्यान, बिशप फ्रँको मुलक्कलने व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती. यामागे त्यांनी खटल्याचा हवाला दिला होता. त्यांनी पत्रात लिहीले होते की, आपल्याविरोधात काही आरोपांची चौकशी सुरु आहे, पोलिसांच्या या चौकशीला सहकार्य देण्यासाठी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे.