शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी 'तिनं' केलं लिंग परिवर्तन, आता गर्लफ्रेंडनं सोडली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 4:55 PM

केरळमधल्या एका महिलेनं पुरुष होण्यासाठी लिंग परिवर्तन केलं आहे. जेणेकरून तिला दुसऱ्या महिलेशी लग्न करता येईल.

थिरुअनंतपूरम- केरळमधल्या एका महिलेनं पुरुष होण्यासाठी लिंग परिवर्तन केलं आहे. जेणेकरून तिला दुसऱ्या महिलेशी लग्न करता येईल. परंतु त्या गर्लफ्रेंडनं आता लग्न करण्यास नकार दिला आहे. 23 वर्षांची दीपू (आताच्या दर्शन)नं पेरुवन्नामुझीमध्ये दोन महिन्यांपूर्वीच लिंग परिवर्तन केलं आहे. सोमवारी दीपूनं पत्रकार परिषद घेत संवाद साधला. दीपू म्हणाला, मी सर्वासाठीच आता चेष्टेचा विषय ठरत आहे. चेन्नईतल्या एका हॉस्पिटलमध्ये 2 लाख रुपये भरून प्रेयसीशी लग्न करण्यासाठी मी लिंग परिवर्तन केलं. माझी प्रेयसी वडाकार येथे राहते, असंही दीपू म्हणाला. दीपूनं प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. दीपू म्हणाला, आम्ही एकत्र राहण्यासाठी संयुक्तरीत्या निर्णय घेतला होता. त्यासाठीच मी माझं लिंग परिवर्तन केले. जेणेकरून मला प्रेयसीशी लग्न करता येईल. परंतु 25 ऑक्टोबरला मी जेव्हा सर्जरी केली, त्यानंतर प्रेयसीनं माझ्याकडे येण्यास नकार दिला. आता तिचं लग्न वडाकार इथल्याच एका व्यक्तीबरोबर ठरलं आहे. तसेच दीपूनं त्या प्रेयसीचं लग्न होणाऱ्या पतीलाही धमकावलं असून, आमच्या दोघांमधून तू साइटला हो, असंही दीपू म्हणाला आहे. दीपूनं यासंदर्भात पेरुवन्नामुझी इथल्या पोलिसांशी संपर्क साधला, परंतु त्या महिलेनं दीपूकडे न जाण्याच्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यासाठी आता उच्च न्यायालयात दीपूनं याचिकाही दाखल केली आहे. त्या महिलेचं पुढील महिन्यात लग्न असून, दीपू तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याच्या प्रयत्नात आहे. कारण प्रेयसीच्या सांगण्यावरूनच दीपूनं लिंग परिवर्तन केल्याचं त्याचं म्हणणं आहे.