नवी दिल्ली – केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर भाजपा खासदार मेनका गांधींनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. स्फोटकांनी भरलेलं अननस खायला देऊन या हत्तीणीची हत्या करण्यात आली आहे. मल्लापूरम भागात अशा घटना वारंवार घडत असतात. या घटनेला जबाबदार असणाऱ्या वन सचिवांना तात्काळ हटवलं पाहिजे तसेच मंत्र्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, राहुल गांधी याच भागाचं लोकप्रतिनिधित्व करतात त्यांनी कारवाई का केली नाही? असा सवाल मनेका गांधी यांनी विचारला आहे.
याबाबत मेनका गांधी यांनी सांगितले की, ही हत्या आहे. मल्लापूरम हे अशा कुख्यात घटनांसाठी प्रसिद्ध आहे. हा देशातील सर्वात हिंसक प्रदेश आहे. येथील लोक रस्त्यावर विष फेकून ३००-४०० पशूपक्षी आणि कुत्र्यांना एकाचवेळी मारतात. केरळ दर तिसऱ्या दिवशी अशाप्रकारे हत्तींना मारलं जातं. केरळ सरकारने मल्लापूरम प्रकरणात आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही, त्यांना कोणाची तरी भीती आहे असं वाटतं. भारतात हत्तींची संख्या घटत असताना आता एकूण २० हजारांच्या खाली हा आकडा आला आहे असं त्या म्हणाल्या.
काय होती केरळची घटना?
केरळ येथील मलाप्पूरम येथे ही धक्कादायक घटना घडली. भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण मानवी वसाहती नजीक आली... तेव्हा स्वतःला बुद्धिजीवी समजणाऱ्या मनुष्य प्रजातीनं त्या आईची निर्घृण हत्या केली. काहीतरी खायला मिळेल या आशेनं आलेल्या या हत्तीणीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर संघर्षानंतर तिने प्राण सोडले.
तर केरळ वनविभागानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हत्तीणी २७ मे रोजी मन्नारकड वनविभागातील वेलियार नदीत सापडली. ती एक महिन्याची गर्भवती होती. या हत्तीणीच्या मृत्यूनंतर केरळ सरकारवर केंद्राचा आणि लोकांचा दबाव वाढला आहे. या घटनेतील लोकांना तात्काळ पकडलं जावं अशी मागणी करण्यात येत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
.तर ‘त्यांना’ दीड लाखांचे बक्षीस देणार; हत्तीणीच्या मृत्यूनंतर वन्यप्राणी संघटनेचं आवाहन
तुम्ही माणुसकी सोडली पण आम्ही नाही; बुडणाऱ्या माणसाला पाहून हत्तीच्या पिल्लानं काय केलं? पाहा
संपत्तीच्या हवास्यापोटी सुपारी देऊन पोटच्या मुलानंच केली बापाची हत्या, तर सुनेनं...
कोरोना संकट काळातही ‘या’ वाहन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली घसघशीत वाढ
कोरोनाग्रस्ताला घरी पाहून कुटुंबाला आनंद; पण मध्यरात्री पोलीस आले अन् रुग्णाला घेऊन गेले, कारण...
लय भारी! घरी जाण्यासाठी श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळाल्याने ‘या’ पठ्ठ्याने काय केलं पाहा?