वायनाड : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत. बुधवारी राहुल गांधी यांनी वायनाडमधील थिरुनेल्ली मंदिरात विधीवत पूजा केली. राहुल गांधी यांचा वायनाडमधील हा दुसरा दौरा आहे. याआधी ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 एप्रिलला आले होते.
"मी देशाच्या पंतप्रधानांसारखा नाही, मी तुमच्याशी खोटे बोलण्यासाठी आलेलो नाही. याठिकाणी नेता म्हणून आलो नाही. येथे मी तुम्हाला 'मन की बात' सांगण्यासाठी आलो नाही. तर तुमच्या मनात काय सुरु आहे, ते जाणून घेण्यासाठी आलो आहे. काही महिन्यांसाठी आपल्यासोबत नातं जोडणार नाही, तर ते आयुष्यभर निभावण्यासाठी आलो आहे", असे वायनाडमधील सभेत जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी सांगितले.
(...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण)
राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. राहुल गांधीच्या उमेदवारीवरून संतापलेल्या डाव्यांनी त्यांना पराभूत करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे.
(राहुल गांधींच्या 'रोड शो'दरम्यान गोंधळ; तीन पत्रकार जखमी)
याशिवाय, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनेही राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाडमधील आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. वायनाडमधून एनडीएचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्म जनसेना (बीडीजेएस) चे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
डाव्यांवर टीका नाहीवायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे डावे पक्ष संतापले असून, त्यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. त्याबाबत विचारता राहुल म्हणाले आहे की, त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला वा टीका केली तरी आपण मात्र डाव्या पक्षांवर अजिबात टीका करणार नाही.