ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २० - केरळमधल्या गाजलेल्या जीशा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीरुल इस्लामविषयी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमीरुल लैंगिकदृष्टया विकृत आहे. त्याला प्राण्यांबरोबर संभोग करायची सवय होती. पाळलेल्या बक-यांबरोबर संभोग केल्यानंतर अमीरुल त्यांची हत्या करायचा.
अमीरुलची कसून चौकशी केल्यानंतर त्याने ही माहिती दिली. काहीवेळा तो संभोग केलेल्या बक-यांचे गुप्तांग कापून टाकायचा. पेरुमबावूरमध्ये अमीरुल एका बकरीबरोबर सेक्स करत असल्याचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला. त्यानंतर त्याच्या या लैंगिक विकृतीची माहिती पोलिसांना मिळाली.
बांधकाम साईटवर अमीरुल काम करायचा. फावल्यावेळेत त्याला मोबाईलवर पॉर्न चित्रपट पहाण्याची सवय होती. एक मजूराने अमीरुलच्या या लैंगिक विकृतीचा व्हिडीओ काढला होता. अमीरुल केरळमधल्या गाजलेल्या जीशा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
कायद्याचे शिक्षण घेणा-या २९ वर्षाची जीशा २८ एप्रिल २०१६ रोजी रहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. अमीरुलने अत्यंत क्रूर पद्धतीने जीशाची हत्या केली होती. केरळ विधानसभा निवडणुकीच्यावेळी हे हत्याकांड झाल्याने विरोधकांनी या विषयाला राजकीय मुद्दा बनवला होता. संपूर्ण केरळमध्ये विविध संघटनांनी जोरदार निदर्शने करुन आरोपीला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली होती.