Rats Eaten Seized Ganja: देशासह जगभरातून उंदरांशी संबंधित विविध प्रकरणे समोर येत असतात. अनेकदा उंदीर एखाद्या महत्वाच्या नोट्स/कागदपत्रे किंवा पैसे कुरतडून टाकतात. यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. पण केरळमधील एका कोर्टातून अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पुरावा म्हणून ठेवलेला गांजा उंदरांनी खाऊन टाकला. तपासात हा प्रकार उघडकीस आला.
उंदरांनी गांजा खाल्लाही घटना तिरुअनंतपुरम येथील न्यायालयाची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टात पुरावा म्हणून ठेवलेला गांजाच उंदरांनी खाल्ला. संपूर्ण प्रकरण असे की, डिसेंबर 2016 पासून एका व्यक्तीवर गांजा बाळगल्याप्रकरणी खटला सुरू होता. साबू असे आरोपीचे नाव असून त्याला तिरुवनंतपुरम कॅन्टोन्मेंट पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींकडे सापडलेला गांजा तपासण्यासाठी पाठवण्यात आला होता तर काही गांजा तिरुअनंतपुरम मॅजिस्ट्रेट कोर्टात पुरावा म्हणून ठेवण्यात आला होता. यादरम्यान उंदरांनी हा गांजा खाल्ला. खटल्याची वेळ आली तेव्हा पुरावा गायब झाला. उंदरांनी गांजा खाल्ल्याचे उघड झाल्यानंतर कोर्टात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर वकील आणि स्वतः न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले आहेत. या प्रकरणात काय निर्णय येणार, हे येणाऱ्या काळात कळेल.
सोनाराच्या दुकानाती हार चोरी
केरळची पहिलीच घटना नाही, जेव्हा उंदराची चर्चा होत आहे. यापूर्वी उंदराने एका सोनाराच्या दुकानातून महागडा हार चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच एका दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उंदराने शोकेसमध्ये ठेवलेला हार चोरून बिळात नेल्याचे कैद झाले होते. केरळच्या कासरगोडा शहरात ही घटना घडली होती. आयपीएस राजेश हिंगणकर यांनी ही क्लिप शेअर केली.