अरे व्वा! महिला मजुरांना सापडला शतकानुशतके जुना असलेला सोन्या-चांदीचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 08:53 AM2024-07-14T08:53:40+5:302024-07-14T08:55:17+5:30

सापडलेल्या वस्तूंमध्ये १७ मोत्यांचे हार, १३ सोन्याचे लॉकेट, चार पदक, पाच पुरातन अंगठ्या, कानातले आणि अनेक चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे.

kerala women workers unearthed gold silver container from digging | अरे व्वा! महिला मजुरांना सापडला शतकानुशतके जुना असलेला सोन्या-चांदीचा खजिना

फोटो - आजतक

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील चेंगलय़ी येथे पावसासाठी खड्डे खोदताना महिला मजुरांना खजिना सापडला आहे. खड्डा खोदत असताना त्याला सोन्या-चांदीने भरलेला कंटेनर सापडला. त्या कंटेनरमध्ये बॉम्ब असू शकतो असे मजुरांना सुरुवातीला वाटल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून कंटेनर उघडून आपल्या ताब्यात घेतला.

कन्नूरमधील सरकारी शाळेजवळ खोदकाम करताना मजुरांना कंटेनरमध्ये मौल्यवान वस्तू सापडल्या. सापडलेल्या वस्तूंमध्ये १७ मोत्यांचे हार, १३ सोन्याचे लॉकेट, चार पदक, पाच पुरातन अंगठ्या, कानातले आणि अनेक चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी मजूर पावसाचे पाणी जमा करण्यासाठी खोल खड्डा खोदत असताना ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर सापडल्यानंतर सुरुवातीला तो बॉम्ब असावा, अशी भीती मजुरांना वाटत होती. मजुरांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि उपनिरीक्षक एमव्ही शिजू यांच्या पथकाने वस्तू ताब्यात घेतल्या. त्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. पुरातत्व विभाग उत्खननात सापडलेल्या वस्तूंची तपासणी करून कंटेनर कधीचा आहे आणि तो कुठून आला याचा शोध घेणार आहे. 

सुरुवातीच्या मुल्यांकनावरून या वस्तू खूप जुन्या असल्याचं दिसून येतं. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ग्रामस्थांना खोदताना हडप्पा काळातील प्राचीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या. प्रसिद्ध हडप्पा कालखंडाची आठवण करून देणारा हा शोध पुरातत्वशास्त्रज्ञ आणि स्थानिक लोकांमध्ये आश्चर्याचा विषय झाला होता. गावकऱ्यांनी धोलाविरा येथे हडप्पा संस्कृतीशी जवळून साधर्म्य असलेल्या तटबंदीचे अवशेष शोधून काढले.
 

Web Title: kerala women workers unearthed gold silver container from digging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.