लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिवाळीसह सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत खादीची धूम सुरू आहे. कॅनॉट प्लेस येथील एका विक्री केंद्रातून १३ नोव्हेंबर रोजी ४० दिवसात चौथ्यांदा एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या खादीची रेकॉर्डब्रेक विक्री झाल्याची माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी सांगितले.खादीचा विक्रमी खप होण्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदींनी स्वदेशीचा नारा देताना खादीच्या वापराला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. खादी आणि ग्रामोद्योगाचा कणा असलेल्या कारागिरांना मोठ्या संख्येने खादीप्रेमींकडून समर्थन मिळत आहे. कोरोनामुळे उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला असतानाही खादी उत्पादन पूर्ण जोमाने सुरू आहे. आर्थिक मंदी असतानाही केव्हीआयसीने खादीच्या विकासाची गती कायम राखण्यात यश मिळविले आहे. कॅनॉट प्लेस येथील विक्री केंद्रावरून गेल्या शुक्रवारी १ कोटी ११.४० लाखाची खादी विकल्या गेली, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.
विक्रमाकडे अशी झाली वाटचाल...२ ऑक्टोबर.. १.०२ कोटीची विक्री२४ ऑक्टोबर... १.०५ कोटीची विक्री७ नोव्हेंबर... १.०६ कोटीची विक्री१३ नोव्हेंबर ... १.११ कोटी