खडसेंनी स्पष्टीकरण द्यावे ; पत्रकार परिषदेत मागणी
By admin | Published: April 08, 2016 12:03 AM
जळगाव : खडसे यांच्या घरासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. हे कार्यकर्ते भाजपाचे असल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी खुलासा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एन.जे. पाटील, डॉ. सरोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
जळगाव : खडसे यांच्या घरासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. हे कार्यकर्ते भाजपाचे असल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी खुलासा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एन.जे. पाटील, डॉ. सरोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. धरणगाव तालुक्यातील नारणे येथील ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची आमची मागणी असल्याच डॉ. सरोज पाटील म्हणाल्या. याप्रश्नी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल हे दोषींना पाठीशी घालत आहेत. या विरुद्ध विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. ही सर्व मिलीभगत असून यात न्याय मिळावा म्हणून आम्ही खासदार रक्षा खडसे यांना भेटायला गेलो होतो. पण आम्हाला वेळ झाला म्हणून त्या निघून गेल्या. त्यामुळे आम्ही घरासमोर उपोषणास बसणार होतो. उपोषणाविषयी पोलिसांना गेल्या २ तारखेला पत्र दिले पण त्याला उत्तर उपोषणास बसल्यावर पोलिसांनी देऊन नकार कळविला. भाजपा कार्यकर्त्यांनी केलेली आरेरावी, मारण्याच्या धमक्या हे सर्व निषेधार्ह असून या प्रकाराचा पालकमंत्री म्हणून खडसे यांनी खुलासा करावा व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, अनिल नाटेकर उपस्थित होते.