पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:09 AM2023-12-20T07:09:03+5:302023-12-20T07:09:44+5:30

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव सुचविले

Kharge's name proposed for PM In INDI Alliance; Allotment of 'India' in mid-January | पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात

पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात

लोकमत न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीच्या मंगळवारी नवी दिल्लीत आलेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव सुचविले. त्यावर खरगे यांनी आधी निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असून, इतर गोष्टी नंतर ठरविता येतील, असे सांगितले.

त्यामुळे जानेवारी २०२४च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निवडणुकीत विजयानंतर पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले.

२२ डिसेंबरला देशभर निदर्शने
संसदेतून विरोधी सदस्यांच्या निलंबनाचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. खासदारांच्या निलंबनाविरोधात २२ डिसेंबरला देशभर निदर्शने करण्यात येणार असल्याचे खरगे म्हणाले.

८ ते १० जाहीर सभा
बैठकीनंतर खरगे म्हणाले, आजच्या बैठकीत २८ पक्षांच्या नेत्यांनी भविष्यात कसे काम करायचे हे ठरवले. सर्व पक्षांनी ८ ते १० जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे. आधी राज्य स्तरावर जागावाटपावर चर्चा होईल व काही प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा केली जाईल.
 

Web Title: Kharge's name proposed for PM In INDI Alliance; Allotment of 'India' in mid-January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.