नवी दिल्ली : हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडीत जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत भाजपाध्यक्षअमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब केले. राज्यात मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री तर, दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री असतील असे अमित शहा यांनी नंतर पत्रकारपरिषदेत जाहीर केले.मनोहरलाल खट्टर यांची शनिवारी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडे नवे सरकार स्थापन करण्यासाठी दावा करण्यात येणार आहे. राज्यात स्थीरतेसाठी आपण ही युती केली असल्याचे चौटाला यांनी सांगितले.
‘मला अपक्ष आमदारांची पाठिंबा असल्याची पत्रे मिळाली असून, सभागृहात मी बहुमत सिद्ध करीन असा विश्वास त्यात व्यक्त करण्यात आला आहे,’ असे खट्टर म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह हे या बैठकीला निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील, असे पक्षाचे सरचिटणीस अनिल जैन यांनी सांगितले. इंडियन नॅशनल लोकदलच्या एकमेव आमदारानेही पाठिंबा दिला आहे. खट्टर शनिवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असले तरी शपथविधी समारंभ दिवाळीनंतरच होण्याची अपेक्षा आहे.
आठ अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. धरमपाल गोंडन, नयनपाल रावत, सोमबीर संगवान, राकेश दौलताबाद आणि रणधीर गोलान या अपक्ष आमदारांनी नड्डा यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला, असे भाजपचे नेते जवाहर यादव यांनी सांगितले.
दिल्लीत अमित शहा-चौटाला यांच्यात चर्चानवी दिल्ली : हरयाणातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांना भाजपच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. लवकरच या सरकारचा शपथविधी होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
चौटाला यांच्या पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. दुष्यंत चौटाला यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. मनोहरलाल खट्टर हे पुन्हा एकदा सरकारचे नेतृत्व करतील. ९० सदस्यीय विधानसभेत भाजपला ४० जागा मिळाल्या आहेत.चौटाला यांनी शुक्रवारी दुपारी स्पष्ट केले की, आम्हाला ना भाजप अस्पृश्य आहे, ना काँग्रेस. आमच्या पक्षाच्या समान किमान कार्यक्रमाशी सहमत होईल त्या कोणत्याही पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ, असे म्हटले.
चौटाला यांची जेजेपीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली. पाठिंब्याबाबत अंतिम निर्णय घ्यायच्या आधी चौटाला यांनी आपले वडील अजय चौटाला यांची तिहार कारागृहात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली.
हरयाणातील मतदारांनी भाजपला नाकारले आहे, असे जाहीर करून भाजप बहुमत मिळवण्यासाठी पैशांचा व सत्तेचा वापर करीत असल्याचा आरोप केला. अशा गैरमार्गांनी स्थापन केलेले सरकार हे ‘बेकायदेशीर’ ठरेल, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांचे विरोधक काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी सरकार स्थापन करण्यासाठीची व्यूहरचना करण्यासाठी येथे मुक्काम ठोकला आहे.