शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

हरयाणामध्ये खट्टर सरकारची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 2:19 AM

काँग्रेस, जननायक जनता पार्टीकडून तगडे आव्हान

चंदीगड : हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी आज (ता. २१) मतदान होत आहे. बहुतांश जागांवर भाजप, काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी ) व जननायक जनता पार्टी यांच्या बहुरंगी लढती होत आहेत. १९,५७८ मतदान केंद्रावर १.८३ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हरयाणामधील ९० जागांसाठी ११६९ उमेदवार मैदानात उतरले आहे. गेल्या १५ दिवसांपासून आघाडीच्या चारही पक्षांनी प्रचाराच्या रणधुमाळीत झोकून दिले होते. २०१४ च्या निवडणुकीत ४७ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा ७५ जागांचा नारा दिला आहे. काँग्रेस १७ व आयएनएलडीला १९ जागांवर समाधान मानावे लागले होते. पण या निवडणुकीत भाजपला काँग्रेस व जननायक जनता पार्टीकडून तगडे आव्हान मिळत आहे.

काँग्रेसने निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि शैलजा कुमारी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली.या नव्या बदलामुळे काँग्रेस प्रचारात आक्रमक झाल्याचे दिसते. भाजपने कलम ३७०, जम्मू काश्मीरचा मुद्दा आणि देशभक्तीच्या मुद्यांवर प्रचारात भर दिला. तर काँग्रेस, जेजेपीने मुख्यमंत्री खट्टर यांच्या सरकारची धोरणे, बेरोजगारी, आर्थिक अडचणी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धारेवर धरले होते. खाण घोटाळा, नोकर भरतीतील गैरकारभार यावर विरोधी पक्षांनी प्रचारात जोर दिला होता.

निवडणुकीत प्रमुख पक्षांनी जाट समाजाच्या भोवतीच रणनिती आखली आहे. २५ टक्के मतदार असणाºया जाट समाजामधून भाजपकडून २०, जननायक जनता पाटीकडून ३३ तर काँग्रेसकडून २५ जाट उमेदवार मैदानात आहेत. तिकीट नाकारल्यामुळे भाजपच्या काही आमदारांनी बंडखोरी केली असून त्याचा किती फटका बसणार हे निकाला दिवशीच समजणार आहे. मुख्यमंत्री मनोहर खट्टर, माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा, काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला,कुलदीप बिश्णोई, दुषंत चौटाला, अभयसिंह चौटाला, कुस्तीपटू बबिता फोगाट, योगेश्वर दत्त, टीकटॉक आर्टिस्ट सोनाली फोगट हे प्रसिद्ध चेहरे निवडणुकीत रिंगणात नशीब आजमावत आहेत. यासोबत लाल कुटुंबातील नेते ही मैदानात आहेत.

१९,५७८ मतदान केंद्रावर जवळपास ७५ हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. २७६११ व्हीव्हीपॅट मशिन मतदान केंद्रावर बसवण्यात आले आहेत. तसेच ८५ लाख महिला मतदारांसह एकूण १.८३ कोटी मतदार आज मतदानांचा हक्क बजावतील असे मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकcongressकाँग्रेस