इंदूरमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये, 18 वर्षीय सोनम ही मुलींच्या 2000 मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमासह चॅम्पियन बनली आहे. रविवारी या स्पर्धेत 6:45:71 सेकंदाची वेळ घेत ती गोल्डन गर्ल ठरली. सोनमने 11 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. 2012 मध्ये लखनौ येथे झालेल्या युवा एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पारुल चौधरीने 7:06:49 सेकंदांसह हा विक्रम केला होता.
बुलंदशहरमधील एका छोट्या गावात राहणाऱ्या सोनमचे वडील वीर सिंह हे वीटभट्टीवर मजूर आहेत. आई इतरांच्या शेतात काम करते. कुटुंबात 9 लोक आहेत. सोनमने 2020 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात अडथळ्यांसह केली. तिचा स्टॅमिना पाहून कोचने तिला स्टीपलचेसमध्ये नशीब आजमावण्यास सांगितले. याच दरम्यान लॉकडाऊन झाला. बुलंदशहरहून दिल्लीत सरावासाठी आलेल्या सोनमला खर्च भागवण्यासाठी डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करावे लागले.
गरीब आर्थिक परिस्थितीमुळे सोनमला आठवीनंतरचे शिक्षण सोडावे लागले. गावातील पोरं सैन्यात भरती होण्याच्या तयारीला धावत असत. त्याला पाहताच सोनमही धावू लागली. स्थानिक स्पर्धा जिंकल्यावर तिला एक ते दोन हजार रुपये मिळायचे.
सोनमने तिच्या वडिलांना तिला कोचिंग देण्यास सांगितले पण घरची परिस्थिती पाहून त्यांनी नकार दिला. यानंतर प्रशिक्षक संजीव कुमार सोनमचा आधार बनले. काहीतरी करून दाखविण्याच्या इच्छेने सोनमने उपाशी राहून ही अनेकवेळा धाव घेतली. गेल्या वर्षी आसाममध्ये झालेल्या ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"