ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - जगप्रसिद्ध अॅपल कंपनीने चिनी बनावटीचे फोन आणि भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आयफोनच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार आयफोन 5 एस आणि आयफोन एसई या दोन गटातील हँडसेटच्या किंमती लवकरच कमी होणार आहेत. आयफोन 5 एसची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत खाली आणली जाऊ शकते. वर्षभरापूर्वी बाजारात आलेला आयफोन एसईची किंमत 20 हजारांवर येण्याची शक्यता आहे. या दोन्ही हँडसेटची स्क्रीन छोटी आहे, पण तीच त्यांची जमेची बाजू आहे.अॅपल दिवाळीपर्यंत एक्सक्लुझिव्ह ऑनलाईन स्टोर सुरु करणार आहे. भारतीय बाजारपेठेतील आपली विक्री वाढवण्यासाठी आयफोन 5 एसची विक्री ऑनलाईन केली जाणार आहे. आयफोनने आपल्या किंमतीत कपात केल्यास या सेंगमेटमधील अँड्रॉईड स्मार्टफोनला मोठी टक्कर देऊ शकतो.
शाओमी, मोटोरोला, ओप्पो, विवो, लेनोवो, सॅमसंगसारख्या कंपनीला अॅपलच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसू शकतो.