शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आम्हाला ठार मारा पण पुन्हा माघारी पाठवू नका- रोहिंग्यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 1:13 PM

भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयावर मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी टीका केली. आता रोहिंग्याही आम्हाला परत पाठवू नका अशी विनंती करत आहेत.

ठळक मुद्देहैदराबादमध्ये रोहिंग्या लहानशा झोपड्यांमध्ये किंवा लहानशा एका खोलीच्या भाड्याच्या घरांमध्ये राहात आहेत. शहराच्या बालापूर, शाहिन नगर, जालपल्ली, असादबाबा नगर, पहाडी शरिफ अशा दक्षिणेकडिल उपनगरांमध्ये ते स्थायिक झाले आहेत.

हैदराबाद, दि,19 - संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये भारतात आलेल्या रोहिंग्यांबद्दल माहिती दिली. भारतामध्ये सर्वाधीक रोहिंग्यांची संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये असल्याचे सांगत रिजिजू यांनी या रोहिंग्यांना पुन्हा मायदेशी म्हणजे म्यानमारला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयावर मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी टीका केली. आता रोहिंग्याही आम्हाला परत पाठवू नका अशी विनंती करत आहेत. एकवेळ आम्हाला इथेच ठार मारा पण मायदेशी म्हणजे म्यानमारला हाकलू नका अशी आर्त विनंती हैदराबादच्या रोहिंग्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे.हैदराबादमध्ये 3800 रोहिंग्या राहात असल्याचा अंदाज आहे. आता या शहरात पाच वर्षे राहिल्यानंतर पुन्हा म्यानमारला मृत्यूच्या खाईत आम्हाला ढकलू नका आणि रोहिंग्यांना मायदेशी पाठवण्याच्या कल्पनेचा परत एकदा मानवाधिकाराच्या दृष्टीने विचार करा असे साकडे हे लोक भारत सरकारला घालत आहेत.

बंगालच्या उपसागरातील तरंगत्या शवपेट्या

स्थलांतरितांनी हंगेरी सोडलेहैदराबादमधील रोहिंग्या समुदायाचा एक सदस्य अब्दुल रहिम याने आपल्या भावना व्यक्त करताना वृत्तसंस्थेला सांगितले, ''भारताने आम्हाला आश्रय दिला याबद्दल धन्यवाद. सरकारने आम्हाला परत पाठवायला ठरवलंच तर ते पाठवू शकतात, पण परत पाठवण्यापेक्षा आम्हाला ठार मारलं तर बरं होईल " 32 वर्षांचा रहिम तीन मुले आणि पत्नीसोबत हैदराबादमध्ये 2012 पासून वास्तव्यास आहे. जर आमचा जीव आणि संपत्ती सुरक्षित राहणार असल्याची खात्री झाली तरच म्यानमारला जाऊ असं त्याचं मत आहे. रहिम म्यानमारच्या रखाइन प्रांतामध्ये शेती करत असे. म्यानमार सरकारने त्याची शेती ताब्यात घेतल्यावर त्याला जीव वाचविण्यासाठी म्यानमार सोडावाच लागला. त्याचे दोन भाऊ बांगलादेशात गेले तर रहिमने भारतात स्थलांतर करणे पसंत केले. सध्या तो इतर रोहिंग्याप्रमाणे रोजंदारीवर काम करतो. दिवसभर काम केल्यावर त्याला 500 रुपये रोजगार मिळतो तर महिन्यातील केवळ 15 दिवसच त्याला काम मिळते.

63 वर्षांचा दुसरा रोहिंग्या आश्रित महंमद युनुस यानेही अशीच मते मांडली. एका आयुष्यात आपल्याला तीनवेळा आश्रिताचं जीवन जगावं लागलं अशा शब्दांमध्ये त्यांने दुःख व्यक्त केलं. ते (म्यानमार सरकार, लष्कर) कधीच आपला शब्द पाळत नाहीत असंही युनुसने सांगितलं. युनुस आपली पत्नी आणि मुलीसोबत हैदराबादमध्ये राहात आहे. म्यानमारच्या लष्कराने झाडलेली गोळीमुळे झालेल्या जखमेची खुण आजही त्याच्या खांद्यावर आहे. या जखमेवर योग्य उपचार न झाल्यामुळे युनुसला बांगलादेशात जाऊन उपचार घ्यावे लागले होते. युनुस म्यानमारच्या अराकान प्रांतामध्ये व्यवसाय करत असे. त्याची सगळी संपत्ती म्यानमार सरकारने जप्त केली. भारतात पहिले काही महिने  जम्मू आणि काश्मीर राज्यानंतर हैदराबादमध्ये सर्वात जास्त संख्येने रोहिंग्या राहात आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये 7000 रोहिंग्या राहात आहेत. हैदराबादमध्ये हे लोक लहानशा झोपड्यांमध्ये किंवा लहानशा एका खोलीच्या भाड्याच्या घरांमध्ये राहात आहेत. शहराच्या बालापूर, शाहिन नगर, जालपल्ली, असादबाबा नगर, पहाडी शरिफ अशा दक्षिणेकडिल उपनगरांमध्ये ते स्थायिक झाले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या रेफ्युजी हायकमिशनरच्या (यूएनएचसीआर) मते भारतात 16 हजार रोहिंग्या राहात आहेत. मात्र  वास्तवात त्यांची संख्या 40 हजार इतकी आहे.

 

टॅग्स :Indiaभारत