चंदीगड : पंजाबच्या तरणतारण जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमाभागातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाºया पाच जणांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ)च्या जवानांनी शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत ठार केले.
एकाच वेळी इतके पाकिस्तानी घुसखोर भारतीय जवानांच्या गोळीबारात ठार होण्याची गेल्या दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. शनिवारी बीएसएफच्या जवानांबरोबरील चकमकीत ठार झालेले घुसखोर हे दहशतवादी आहेत की अमली पदार्थांचे तस्कर हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.शस्त्रसाठा केला जप्तया ठिकाणाहून एक एके- ४७ रायफल, दोन मॅग्जिन, २७ गोळ्या, ९ एमएमच्या चार पिस्तूल, दोन मोबाइल आणि ६१० रुपयांचे पाकिस्तानी चलन हे साहित्या जप्त करण्यात आले आहे.शनिवारच्या घटनेबाबत बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीत काही जण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे बीएसएफच्या 103 बटालियनमधील जवानांना आढळून आले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, घुसखोरांनी बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच पाकिस्तानी घुसखोर ठार झाले आहेत.असा आहे दाऊदचा पत्तापाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा पत्ता पाकिस्तानातील कराचीमध्ये व्हाइट हाऊस, सौदी मशिदीजवळ असा आहे. याशिवाय, घर क्र. ३७, ३० वा मार्ग- संरक्षण, निवास प्राधिकरण, कराची आणि कराचीतील नूराबादच्या पहाडी भागातील पॅलेटियल बंगला ही त्याची प्रॉपर्टी आहे.