Pregnant Elephant's Death In Kerala: 'त्या' गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रतन टाटा म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 12:53 PM2020-06-04T12:53:45+5:302020-06-04T13:10:34+5:30

Pregnant Elephant's Death In Kerala: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही हत्तीणीच्या मृत्यूबाबत निषेध केला असून त्यांनी सोशल मीडियावर या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Killing of pregnant elephant in Kerala is 'meditated murder': Ratan Tata | Pregnant Elephant's Death In Kerala: 'त्या' गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रतन टाटा म्हणाले…

Pregnant Elephant's Death In Kerala: 'त्या' गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूबाबत रतन टाटा म्हणाले…

Next
ठळक मुद्देया घटनेबाबत संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, रोहित शर्मा यांच्यासह क्रीडा विश्वातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

मुंबई : केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला काही लोकांनी फटाक्याने भरलेले अननस खायला दिले. त्यानंतर तिच्या तोंडात ते फटाके फुटले. त्यानंतर या असह्य वेदनेसह ती एका नदीत जाऊन उभी राहिली. पण, अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.

या घटनेबाबत संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, रोहित शर्मा यांच्यासह क्रीडा विश्वातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही या घटनेचा निषेध केला असून त्यांनी सोशल मीडियावर या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "लोकांच्या समुहाने एका निष्पाप, सुप्त गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे मला समजल्यानंतर धक्का बसला आणि दुख: झाले."

याचबरोबर, निष्पाप प्राण्यांसोबत असे कृत्य करणे म्हणजे एखाद्या निरपराध माणासाचा खून केल्यासारखेच असल्याचेही रतन टाटा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटले आहे.

दरम्यान, भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण काहीतरी खायला मिळेल या आशेने केरळ येथील मलाप्पूरम येथील एका वसाहतीत गेली. पण, येथील स्थानिकांनी तिला अननस खायला दिले. त्यानंतर ते तिने खाल्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.

स्थानिकांनी तिला अननसातून फटाके खायला दिल्याचे म्हटले जात आहे. अननसाचे आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

आणखी बातम्या

CoronaVirus News : भारतात एक वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस, शास्त्रज्ञांचा दावा

Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

बायको असावी तर अशी... पतीने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, पण...

Web Title: Killing of pregnant elephant in Kerala is 'meditated murder': Ratan Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.