ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - लष्कर कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु होती. या चकमकीदरम्यान दोघांना ठार करण्यात आलं. दोघांचा खात्मा झाल्यानंतर अखेर चकमक थांबली आहे. मात्र या चकमकीदरम्यान दोन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.
"दहशतवादी एका घरात लपून बसले होते, यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु असताना गोळ्या लागल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची", माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितलं आहे. दहशतवाद्यंच्या ताब्यात असलेल्या घरातून 17 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये पहाटेपासून चकमक सुरु होती. दहशतवादी परिसरातील एका घरात लपून बसले होते. या गोळीबारात ज्या दोन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
J&K: Two LeT terrorists, Bashir Lashkari & Azad Malik, gunned down by security forces during an encounter in Anantnag. pic.twitter.com/CAVhvSD1Jw— ANI (@ANI_news) July 1, 2017
"बाटपोरा गावात दहशतवादी एका घरात लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी ऑपरेशन लाँच केलं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. क्रॉस फायरिंग सुरु असताना एका महिलेला गोळी लागून ती जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता", अशी माहिती पोलिसांनी दिली.
"ताहिरा असं या 44 वर्षीय महिलेचं नाव आहे. चकमकीदरम्यान जखमी झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिला वाचवू शकलो नाही", अशी माहिती अधिका-यांनी दिली. दुस-या व्यक्तीचं नाव शादाब अहमद चोपान (21) असं आहे.
J&K: Encounter underway in Dailgam in Anantnag,according to Police three LeT terrorists including Commander Bashir Lashkari are trapped— ANI (@ANI_news) July 1, 2017
याआधी सुरक्षा जवानांनी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर संपुर्ण परिसरात गराडा घातला होता, आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बशीर लष्करी असल्याची तेव्हा माहिती मिळाली होती. काश्मीरमधील पोलीस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलीस कर्मचा-यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. 16 जून रोजी ही हत्या झाली होती.
फिरोज अहमद दार
सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. दहशतवादी सामान्यांचा ढाल म्हणून वापरत करत होते. अखेर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं, आणि त्यांनी सामन्यांचीही सुटका केली.