किम जोंग उन आता माकपाचा पोस्टरबॉय, केरळमधील कार्यकर्त्यांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 02:40 PM2017-12-19T14:40:39+5:302017-12-19T17:09:28+5:30
अणू कार्यक्रम आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे.
तिरुवनंतपुरम- उत्तर कोरियाचा हुकुमशहा आणि आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे. केरळमधील नेडुमकांडम येथे होणाऱ्या माकपाच्या बैठकीसाठी लावलेल्या पोस्टरवर थेट किम जोंग उन झळकल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. माकपाच्या या कृतीमुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे.
Kim Jong-un finds place in CPM’s posters in Kerala!!
— Sambit Patra (@sambitswaraj) December 17, 2017
No wonder they have converted Kerala into Killing fields for their opponents!
Hope the left is not planning to launch 🚀 missiles at the RSS,BJP offices as their next gruesome agenda! pic.twitter.com/6LHf1dVtAy
विविध सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुवनंतरपूरमपासून 200 किमी अंतरावर असेल्या इडुक्की जिल्ह्यातील नेडुमकांडम येथे हे पोस्टर लावलेले आहे. या आठवड्यात झालेल्या बैठकीची माहिती परिसरातील कार्यकर्त्यांना देण्यासाठी हे पोस्टर लावलेले होते. या पोस्टरवर किम जोंग उनचे छायाचित्र वापरण्यात आले होते. हे पोस्टर काही वेळातच सोशल मीडियावर पसरले आणि माकपावर चहूबाजूंनी टीका सुरु झाली. हे गाव एम.एम मणि या मंत्र्यांच्या मतदारसंघातील आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या पोस्चरचा फोटो ट्वीट करुन माकपावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, " माकपाच्या पोस्टरवर किम जोंग उनला स्थान मिळाले आहे. केरळचे रुपांतर विरोधकांची हत्या करुन संपवण्याच्या प्रदेशात रुपांतर करण्याच्या त्यांच्या कार्यामुळे यात फारसे काही नवे नाही. आपल्या भयानक अजेंडाबरोबर माकपा आता रा.स्व.संघ आणि भाजपाच्या कार्यालयांवर क्षेपणास्त्र डागण्याचा विचार सुरु नसावा ही अपेक्षा.