तिरुवनंतपुरम- उत्तर कोरियाचा हुकुमशहा आणि आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे. केरळमधील नेडुमकांडम येथे होणाऱ्या माकपाच्या बैठकीसाठी लावलेल्या पोस्टरवर थेट किम जोंग उन झळकल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. माकपाच्या या कृतीमुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जबरदस्त टीका केली आहे.
किम जोंग उन आता माकपाचा पोस्टरबॉय, केरळमधील कार्यकर्त्यांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 17:09 IST
अणू कार्यक्रम आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे.
किम जोंग उन आता माकपाचा पोस्टरबॉय, केरळमधील कार्यकर्त्यांची कामगिरी
ठळक मुद्देतिरुवनंतरपूरमपासून 200 किमी अंतरावर असेल्या इडुक्की जिल्ह्यातील नेडुमकांडम येथे हे पोस्टर लावलेले आहे.या आठवड्यात झालेल्या बैठकीची माहिती परिसरातील कार्यकर्त्यांना देण्यासाठी हे पोस्टर लावलेले होते.