शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

लोकसभेचे किंगमेकर : बीजेडी, टीआरएस, वायएसआर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:55 AM

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू वा बसपाच्या मायावती निवडणुकांमध्ये लोकसभेत कोणालाच स्पष्ट बहुमत नसेल तर किंगमेकर बनतील हे निवडणूक तज्ज्ञांचे भाकीत चुकीचं ठरण्याची शक्यता आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू वा बसपाच्या मायावती निवडणुकांमध्ये लोकसभेत कोणालाच स्पष्ट बहुमत नसेल तर किंगमेकर बनतील हे निवडणूक तज्ज्ञांचे भाकीत चुकीचं ठरण्याची शक्यता आहे. आता तीन नवे किंगमेकर राजकीय क्षितिजावर असून ते कोणत्याही गटामध्ये सहभागी नाहीत. बिजू जनता दल (ओडिशा), वायएसआर काँग्रेस (आंध्र प्रदेश) आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती (तेलंगणा) लोकसभेच्या ४५ ते ५० जागा जिंकण्याची शक्यता असून भाजपाला जर २०० जागांवरच समाधान मानावे लागल्यास हे पक्ष नवे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.या तिन्ही पक्षांनी तटस्थ राहून लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक तज्ज्ञांनुसार वायएसआर काँग्रेस लोकसभेच्या २५ जागा असलेल्या आंध्र प्रदेशात प्रभावी आहे. हा पक्ष काँग्रेसमधूनच निर्माण झाला आहे. विमान अपघातात वडिलांचे निधन झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी पक्षात बंड करून वायसआर काँग्रेस स्थापन केला. जगनमोहन रेड्डी यांना लोकसभेच्या १५-१७ जागा आपण जिंकू अशी खात्री आहे. चंद्रबाबू नायडू यांनी रालोआतून बाहेर पडण्याचे एक कारण भाजपा आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातील वाढते संबंध हे आहे. त्यांच्यातील वाढत्या मैत्रीचा आणखी एक संकेत म्हणजे प्रशांत किशोर हे वायएसआर काँग्रेसचे निवडणूक रणनीती ठरवण्याचे करीत असलेले काम. जगनमोहन रेड्डी यांनी किशोर यांना हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात मोठी जागा दिली आहे. ते तेथून निवडणूक मोहीम चालवत आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभेच्या १७ पैकी १५ जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. केसीआर यांनी विधानसभा निवडणुकीत फार मोठे यश मिळवून आपले स्थान दाखवून दिले. काँग्रेस व भाजपा तेलंगणात सर्व १७ जागा लढवत आहेत. परंतु, निवडणूक तज्ज्ञांच्या मते त्या दोघांनाही शून्य यश मिळेल.ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल १५ ते १७ जागा जिंकेल. बिजू जनता दलाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २१ पैकी २० जागा तर भाजपाने एक जागा जिंकली होती. नवीन पटनाईक यांना शांत करण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे. बिजू जनता दलाचा राजीनामा देऊन बी. जे. पांडा भाजपात दाखल झाले त्यांनाही भाजपाने बाजुला ठेवले असल्यामुळे ते आता नाराज व एकाकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील पुरीमधून निवडणूक लढवून पटनाईक यांच्याशी दोन हात करण्याचा विचार केला होता. आता मात्र ते त्या विचारात नाहीत.नवीन पटनाईक यांच्या भगिनी गीता मेहता यांना मोदी यांनी पद्मश्री किताब देऊ केला. परंतु, त्यांनी तो चुकीची राजकीय संदेश जाईल, असे सांगून तो नाकारला. बिजू जनता दल व भाजपा यांच्यातील संबंधांचा आणखी एक संकेत म्हणजे बिजदचे नेते चिटफंड घोटाळ््यात गुंतलेले असूनही सीबीआय शांतच आहे.रालोआकडून अपेक्षा कमीचभाजपा २०० जागांच्या पुढे न गेल्यास या ५० जागा महत्त्वाची भूमिका बजावतील. रालोआतील घटक पक्ष (शिवसेना, जेडीयू, लोकजनशक्ती पक्ष, अपना दल, अकाली दल, अण्णा अद्रमुक) जेमतेम २५-३० जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच भाजपा व नरेंद्र मोदी यांना नव्या किंगमेकरची गरज नक्कीच भासेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण