शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 11:53 AM

Kisan Suicide At Tikri Border : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या एका शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला शेतकरी काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनात सामील झाला होता. आत्महत्या केलेला शेतकरी शनिवारी रात्री अतिशय निराश होता, असं त्याच्यासोबत असणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं. टिकरी सीमेवर या शेतकऱ्यानं रात्री उशिरा गळफास घेतला. (farmer suicide at Tikri border left suicide note) 

आत्महत्या केलेला शेतकरी जींदच्या सिंहवाला येथील रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव दरियाव सिंह असून तो ५० वर्षांचा होता. टिकरी येथील एका बस स्टँडजवळील झाडाला प्लास्टिकच्या रशीनं गळफास घेत दरियाव यांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी शेतकऱ्यांना दरियाव यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आणि एक सुसाईड नोट देखील आढळून आली. 

सुसाइड नोटमध्ये मोदी सरकारचा उल्लेखआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यानं सुसाईड नोटमध्ये मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. "भारतीय किसान युनियन झिंदाबाद. मोदी सरकार केवळ तारखांवर तारीख देत आहे. हे काळे कायदे केव्हा रद्द होतील याची काहीच शाश्वती नाही", असं लिहून शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय. 

पोलिसांकडून मृतदेह ताब्यातरविवारी सकाळी शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तातडीने पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच मृतदेह झाडावरुन खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पीटलमध्ये पाठवला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनाही याची माहिती देण्यात आली आहे. हॉस्पीटलमध्ये कुटुंबिय आल्यानंतरच मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmers Protestशेतकरी आंदोलन