Kisan Mahapanchayat in Ramleela Maidan: दिल्लीतील रामलीला मैदानावर उद्या, (14 मार्च) होणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या महापंचायतीला (Kisan Mahapanchayat) दिल्लीपोलिसांनी परवानगी दिली आहे. पण, संयुक्त किसान मोर्चाला महापंचायत घेऊ देण्यासाठी अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत.
रात्री कुणालाही राहता येणार नाहीपोलिसांच्या अटींनुसार, पंचायतीच्या वेळी रामलीला मैदानात 5000 पेक्षा जास्त लोक थांबू शकणार नाहीत. कोणीही ट्रॅक्टर ट्रॉली आणणार नाही. कोणत्याही प्रकारची शस्त्रे सोबत ठेवता येणार नाहीत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत चालेल, त्यानंतर सर्वांना परत जावे लागेल. रात्री कोणालीही रामलीलावर राहता येणार नाही.
किसान मोर्चाच्या नेत्यांचा होकारपोलिसांनी दिलेल्या सशर्त परवानगीनुसार, कोणत्याही प्रकारची रॅली किंवा निदर्शने करता येणार नाहीत. युनायटेड किसान मोर्चाच्या नेत्यांनी या अटींवर सह्या केल्या, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एनओसी देऊन परवानगी दिली आहे. पोलिसांनी सर्व शेतकरी नेत्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनदेखील केले आहे.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी जारी केली ॲडव्हायझरी दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे. 14 मार्च 2024 रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या किसान महापंचायतीमुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार, गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत जवाहरलाल नेहरू मार्ग, बहादूर शाह जफर मार्ग, असफ अली रोड, स्वामी विवेकानंद मार्ग, नेताजी सुभाष मार्ग, मिंटो रोड, महाराजा रणजीत मार्ग, सिंग फ्लायओव्हर, भवभूती मार्ग, चमन लाल मार्ग, बाराखंबा रोड, टॉलस्टॉय मार्ग, जयसिंग रोड, संसद मार्ग, बाबा खरक सिंग मार्ग, अशोक रोड, कॅनॉट सर्कस आणि डीडीयू मार्गावर वाहतूक कोंडी असेल.