शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

संघ स्वयंसेवक असल्यापासून मैत्रीचं नातं, मोदींनी जिगरी दोस्ताला दिलं 'खास' खातं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 3:53 PM

शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले जी. किशन रेड्डी १९७७ मध्ये जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा काल शपथविधी पार पडला. यानंतर आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नरेंद्र मोदींचे अगदी जवळचे मित्र जी. किशन रेड्डी यांना गृहराज्यमंत्रीपद दिले आहे.

अगदी सामान्य कुटुंबातून आलेले जी. किशन रेड्डी हे नरेंद्र मोदींना संघ स्वयंसेवक असल्यापासून अगदी जवळून ओळखतात. १९९४ मध्ये ते मोदींसोबत अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेलंगणमध्ये पहिल्यांदाच भाजपाचे चार खासदार विजयी झाले आहेत. या यशामध्ये जी. किशन रेड्डी यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्याचं बक्षीस म्हणूनच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले जी. किशन रेड्डी १९७७ मध्ये जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले. २००४ मध्ये रेड्डी यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि आंध्र प्रदेश विधानसभेत ते आमदार झाले. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही ते निवडून आले होते. याशिवाय, जी. किशन रेड्डी यांनी तीन वेळा संयुक्त आंध्र प्रदेशचे भाजपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात देशाचा गृह कारभार अशा दोन नेत्यांकडे सोपविण्यात आला आहे की, ते हिंदू विचारधारेचे आहेत. अमित शहा आधीपासून हिंदुत्ववादी आहेत आणि जी. किशन रेड्डी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे देशातील हिंदुत्ववादी मुद्यावर भाजपा ठाम असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीAmit Shahअमित शहाBJPभाजपा