काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नव्या नेत्याची एन्ट्री; कोण आहेत केएन त्रिपाठी? जाणून घ्या...  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:19 PM2022-09-30T18:19:59+5:302022-09-30T19:32:09+5:30

KN Tripathi : त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

kn tripathi enters in congress president polls will give tough fight to mallikarjun kharge shashi tharoor | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नव्या नेत्याची एन्ट्री; कोण आहेत केएन त्रिपाठी? जाणून घ्या...  

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नव्या नेत्याची एन्ट्री; कोण आहेत केएन त्रिपाठी? जाणून घ्या...  

Next

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी रंजक बनत आहे. पहिल्यांदा अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह आणि नंतर मल्लिकार्जुन खरगे यांच्या एन्ट्रीने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होईल, असे म्हटले जात होते. पण, आता अशाच एका नेत्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा कोणालाच अंदाज नव्हता. आता झारखंड सरकारचे माजी मंत्री केएन त्रिपाठीही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.

त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. "मी आज पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, त्याचा आदर केला जाईल", असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्रिपाठी म्हणाले. विशेष म्हणजे त्रिपाठी राजकारणात येण्यापूर्वी हवाई दलात होते. 2005 मध्ये त्यांनी लष्कराची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पहिल्यांदाच डालटनगंज मतदारसंघातून निवडणूक लढवली. याठिकाणी त्यांचा इंदरसिंग नामधारी यांच्याकडून पराभव झाला. 2009 मध्ये काँग्रेसने त्यांना पुन्हा डालटनगंज मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी ते विजयी झाले. आमदार झाल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री करण्यात आले.


त्रिपाठी एका शेतकरी कुटुंबातील
2014 मध्ये केएन त्रिपाठी यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. यावेळी त्यांचा जेव्हीएम उमेदवार आलोक चौरसिया यांच्याकडून 5000 मतांनी पराभव झाला. वडिलांच्या निधनामुळे आलोक चौरसिया यांना सहानुभूतीची मते मिळाल्याचे बोलले जाते. आमदार झाल्यानंतर आलोक चौरसिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, डालटनगंजच्या रेडमा काशी नगर परिसरातील रहिवासी केएन त्रिपाठी एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1972 रोजी बिश्रामपूरच्या टोलरा गावात झाला.

लष्कराची नोकरी सोडली आणि राजकारणात आले
त्रिपाठी यांनी प्राथमिक शिक्षण डालटनगंज येथील दशमेश मॉडेल स्कूलमधून केले. यानंतर त्यांनी जिल्हा शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. डालटनगंज जीएलए कॉलेजमधून इंटरमीडिएट आणि ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर केएन त्रिपाठी हवाई दलात दाखल झाले. बंगळुरू आणि सुरतगडमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी लष्कराची नोकरी सोडली आणि राजकारणात आले. विशेष म्हणजे 2 ऑक्टोबर 2000 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी कृष्णानंद त्रिपाठी एका सभेला उपस्थित होते. या सभेतून त्यांची राजकारणाकडे वाटचाल झाली. त्यांचे वडील पंडित जग नारायण त्रिपाठी हे शेतकरी होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".

Web Title: kn tripathi enters in congress president polls will give tough fight to mallikarjun kharge shashi tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.