कर्नाटकच्या निवडणुकीत किती कोट्यधीश जिंकले? आमदारांकडे किती संपत्ती? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 07:16 AM2023-05-17T07:16:11+5:302023-05-17T07:16:42+5:30
पुन्हा निवडून आलेल्या आमदारांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाल्याचे एडीआरने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
मुंबई : कर्नाटकमध्ये निवडून आलेल्या १८० आमदारांकडे ५ कोटींपेक्षा अधिक संपत्ती असून, ५० लाखांपेक्षा कमी संपत्ती असलेले केवळ २ आमदार निवडून आले आहेत. करोडपती आमदारांच्या संख्येत वाढ असून, पुन्हा निवडून आलेल्या आमदारांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाल्याचे एडीआरने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
आमदारांकडे किती संपत्ती?
संपत्ती टक्के आमदार
५ कोटींपेक्षा अधिक ८१% १८०
२ कोटी ते ५ कोटी १४% ३१
५० लाख ते २ कोटी ४% १०
५० लाखांपेक्षा कमी १% २
पक्षनिहाय करोडपती
पक्ष आमदार टक्के
अपक्ष २ १००%
सर्वोदय कर्नाटक १ १००%
कल्याण राज्य प्रगती १ १००%
काँग्रेस १३२ ९९%
भाजप ६३ ९६%
आमदारांचे वय काय? ़
१५६ आमदार हे ५१ ते ८१ वय (७०%)
३ आमदार ८० पेक्षा अधिक
६४ आमदार हे २५-५० वर्षे
पुन्हा निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती किती वाढली?
काँग्रेस : ५१ ३७ कोटी ७१.२१%
भाजप : ३८ १८ कोटी ६६.८८%
जेडीएस : ४ २१ कोटी ३९.६८%