नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना आमंत्रित केले होते. यानंतर सोमवारी सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. खेळाडूंशी आवड लक्षात घेऊन त्यानुसार खाण्याचा मेन्यू ठरवण्यात आला होता. याच कार्यक्रमात पंतप्रधाननरेंद्र मोदी आताच्या घडीला दिवसातून एकदाच जेवत असल्याची बाब समोर आली. पंतप्रधान मोदी एकभुक्त का राहतात, याचा खुलासा खुद्द पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. (know about why pm narendra modi have only one meal in a day in this time period)
“PM मोदी म्हणाले, उद्योग खाते मुद्दाम तुमच्याकडे दिलेय; तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण करा”
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासाठी त्याचा आवडता पदार्थ म्हणजेच चूरमा मेन्यूमध्ये ठेवला होता. नीरजने, तुम्हालाही माझ्यासोबत चूरमा खावा लागेल, असे म्हणत पंतप्रधान मोदींना चूरमा खाण्यासाठी आग्रह केला. मात्र, त्यावेळी मोदींनी नीरजला नकार दिला. सध्या चातुर्मास सुरु असून, या कालावधीमध्ये मी दिवसातून एकदाच जेवतो, असे मोदींनी नीरजला सांगितले.
मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस
अनेकजण दिवसातून एकदाच जेवतात
पंतप्रधान मोदी चातुर्मासासोबतच नवरात्रीच्या कालावधीमध्येही उपवास करतात. नवरात्रीमध्ये पंतप्रधान मोदी निवडक पदार्थांना आपल्या आहारामध्ये स्थान देतात. नरेंद्र मोदी हे गेल्या ३२ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवास करतात. याशिवाय, दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. चातुर्मासाच्या कालावधीत शरीरामधील दाहकता वाढवणाऱ्या, पित्त वाढवणाऱ्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. अनेकजण पावसाळी वातावरण आणि सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन दिवसातून एकच वेळ जेवण घेतात. पंतप्रधान मोदीही चातुर्मासात एकाच वेळेचे जेवण करतात. मोदींनी नीरजला हे सांगतानाची दृष्य कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये आहेत.
“सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श”: नितीन गडकरी
दरम्यान, सन २००१ ते २०१४ या काळात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना मोदी नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत शस्त्रांची पूजा करायचे. गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. हे दोन्ही नेते भाजपामधील प्रमुख नेत्यांपैकी आहेत.