निवडणूक आयोगाने सोमवारी संयंकाळी एक आदेश जारी करत तीन राजकीय पक्षांना असलेला 'राष्ट्रीय पार्टी'चा दर्जा काढला आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने दोन प्रादेशिक पक्षांचा दर्जाही काढून घेतला आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये, निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशातील भारत राष्ट्र समिती (BRS) आणि उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल (RLD) यांचा प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढला आहे. या आदेशानंतर आरएलडी आता नोंदणीकृत मान्यता नसलेला राजकीय पक्ष बनला आहे.
याच बरोबर ECI ने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. AAP कडून बऱ्याच दिवसांपासून याची मागणी केली जात होती. तर जाणून घेऊयात, ज्या पक्षांचा राष्ट्री पक्ष म्हणून दर्जा काढला, तो का काढण्यात आला? याचे नियम काय आहेत?
निवडणूक आयोग मान्यता प्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांच्या स्टेटसची समीक्षा करत असतो. जी सिंबॉल ऑर्डर 1968 अंतर्गत एक नियमित प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगाने 2019 पासून ते आतापर्यंत तब्बल 16 राजकीय पक्षांचे स्टेटस अपग्रेड केले आहे. तसेच 9 राष्ट्रीय/राज्य राजकीय पक्षांचे करंट स्टेटस परत घेतले आहेत.
या 3 पक्षांकडून काढून घेण्यात आला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा? -निवडणूक आयोगाने म्हटल्यानुसार, या पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला होता, मात्र हे पक्ष तेवढे रिझल्ट आणू शकले नाही. यामुळे हा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यांना 2 लोकसभा निवडणुका आणि 21 विधानसभा निवडणुकांसाठी पुरेशी संधी देण्यात आली होती. त्यानंतर या पक्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढण्यात आला आहे. पण, पुढील निवडणुकांमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर हे पक्ष पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवू शकतात.