ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार करताना १९ नव्या चेह-यांना संधी दिली. मोदींच्या नव्या टीममध्ये सहा वकिल, एक विख्यात कर्करोग तज्ञ आणि एक पीएचडी धारकाचा समावेश आहे. याशिवाय चार मंत्री पोस्ट ग्रॅज्युएट, पाच ग्रॅज्युएट आणि दोघांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले नाही. अंडरग्रॅज्युएट मंत्र्यांमध्ये आठवलेंचा समावेश आहे.
सहा वकिलांपैकी पीपी चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात, विजय गोएल, फग्गन सिंग कुलस्ते अर्जुन राम मेघवाल, एसएस अहलुवालिया आणि राजन गोहेन हे सुद्धा वकिल आहेत. सुभाष रामराव भामरे हे एकमेव वैद्यकीय पार्श्वभूमीचे मंत्री आहेत. कर्करोगावर शस्त्रक्रिया करणारे ते विख्यात सर्जन आहेत.
मंत्री बनलेल्या क्रिष्णा राज, अनुप्रिया पटेल, सीआर चौधरी आणि अनिल महादेव दवे हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. एमजे अकबर, रमेश जिगाजीनागी, जसवंत भाभोर, पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मानदाविया हे ग्रॅज्युएट आहेत. महेंद्रनाथ पांडे यांनी हिंदी भाषेत पीएचडी केली आहे. अजय टामटा आणि रामदास आठवले हे अंडरग्रॅज्युएट आहेत.