शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

"वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या"; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 2:48 PM

ग्रेटा थनबर्ग आणि रिहानानं केलं होतं शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट

ठळक मुद्देवक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घेणं आवश्यक, परराष्ट्र मंत्रालयाचं ट्वीटरिहाना, ग्रेटा थनबर्गनं शेतकरी आंदोलनाला दिलं होतं समर्थन

देशात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत कोणत्याही प्रकारची टीका टिपण्णी किंवा ट्वीट करण्यापूर्वी त्या प्रकरणाचं सत्य जाणून घेणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकरणांवर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करण्यापूर्वी तथ्य जाणून घंणं आवश्यक आहे, तसंच याबाबत अधिक समज असणंही आवश्यक आहे. या प्रकरणी प्रसिद्ध व्यक्तींकडून आणि अन्य व्यक्तींकडून सोशल मीडियावर हॅशटॅगचा होत असलेला वापर आणि तसंच जी काही वक्तव्य केली जात आहेत ती योग्य नाही आणि बेजबाबदारपणाची आहेत," असं अनुराग श्रीवास्तव म्हणाले. संसदेत पूर्ण चर्चा करण्यात आल्यानंतरच कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी हे कायदे पारित करण्यात आय़ले आहे. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसंच शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. या नव्या कायद्यांबाबत फार कमी लोकांमध्ये असंतोष असल्याचंही या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे."आंदोलकांच्या भावनांचा आदर करत सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांकडून आतापर्यंत ११ वेळा बैठक घेण्यात आली. सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्यांना हा कायदा तात्पुरता रोखून ठेवण्याचा पर्याय देखील दिला आहे," असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. ग्रेटा थनबर्गनेकडून समर्थनरिहानानंतर आता स्विड‍िश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं तिनं म्हटले आहे.रिहानंनंही केलं ट्वीटदिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं. रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितलं आहे. रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? #FarmersProtest. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीIndiaभारतTwitterट्विटर