शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Bhaiyuji Maharaj: जाणून घ्या कोण होते भय्यू महाराज?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 3:08 PM

राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे.

मुंबई- भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख होतं. इंदूरमधील बापट भागात त्यांचं आश्रम आहे. तेथूनच ते सामाजित कार्याचं संचालन करायचे. भय्यू महाराज यांची प्रत्येत क्षेत्रात ओळख होती. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल तसंच अनेक सिने कलाकार त्यांच्या आश्रमात जायचे. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करायचे. 

अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना तत्कालीन सरकराने भय्यू महाराज यांना अण्णांचं उपोषण सोडविण्यासाठी पाठवलं होतं. भय्यू महाराज यांच्या हातून ज्यूस पिऊन अण्णानी उपोषण सोडलं. त्यानंतर भय्यू महाराज माध्यमांच्या नजरेत आले. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदी सद्भवना उपोषणला बसले होते. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं होतं. 

भय्युजी महाराज यांनी ग्लोबल वॉर्मिंगबद्दल विशेष चिंता व्यक्त केली होती. गुरुदक्षिणा म्हणून ते वृक्षारोपण करायचे. आतापर्यंत त्यांनी 18 लाख झाडांची लागवड केली होती. देवास आणि धार जिल्ह्यांमध्ये त्यांनी अनेक तळ्यांच्या खोदकामासाठी मदत केली होती. नारळ, शाल, फुले अशाप्रकारची भेट देण्याऐवजी त्यासाठी लागणारा पैसा शिक्षणासाठी खर्च केला जावा असं त्यांचं मत होतं. त्यांनी स्थापन केलेला ट्रस्ट 10 हजार मुलांना स्कॉलरशिप देतो. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

मध्य प्रदेशात नर्मदा नदीसाठी जनजागृती अभियान चालवण्यासाठी एक विशेष समिती स्थापण्यात आली होती. या समितीमध्ये नर्मदानंद, हरिहरानंद, कॉम्प्यूटर बाबा, भय्यू महाराज आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. या पाचही जणांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वृक्षारोपण, जल संरक्षण आणि स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यासाठी ही विशेष समिती तयार करण्यात आली आहे. 

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्यावतीनं अहमदनगरमधील कोपर्डी इथं बलात्कार पीडित चिमुकलीचं स्मारक बांधण्यात आलं होतं.महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते त्या काळात भय्यूजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते.भय्यू महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं 10 मे 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकारी जखमी झाले होते.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्युजी महाराजSuicideआत्महत्याDeathमृत्यू