कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी संजय रॉय सध्या जेलमध्ये आहे. पण आता जेलमध्ये त्याचे नखरे पाहायला मिळत आहेत. चपाती-भाजी खाण्याऐवजी त्याला आता चायनीज फूड खायचं आहे. संजय रॉय नवनवीन गोष्टींची मागणी करत आहे. याआधी त्याने मटण मागितलं होतं. झोपण्यासाठीही वेळ हवा होता आणि आता त्याला अंडी आणि चाजनीज हवं आहे.
पॉलिग्राफ टेस्टआधी प्रेसिडेन्सी जेलमध्ये सेल नंबर २१ मध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. आता त्याला जेलमधील साधं जेवण खाण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळेच त्याला चायनीज खाण्याची इच्छा आहे, अशी मागणी त्याने जेल प्रशासनाकडे केली आहे. मात्र, जेल प्रशासनाने त्याला क़डक शब्दांत फटकारलं आणि अंडी, चायनीज फूड देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
जेलच्या नियमांनुसार, कैद्यांना तेच जेवण दिले जाते जे सर्व कैदी खातात तसेच कोणत्याही कैद्याला घरचं अन्न खाण्याची परवानगी नाही, कारण ते जेलच्या नियमांच्या विरोधात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलमध्ये दिलं जाणारी चपाती आणि भाजी पाहून संजय रॉय संतापला आणि अंडी, चायनीजची मागणी केली. अधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतर चपाती-भाजी खाल्ली.
ट्रेनी डॉक्टरच्या हत्येचा आरोप असलेल्या संजय रॉयला आपल्या कृत्याबद्दल अजिबात पश्चाताप नाही, असं दिसतं. त्याला फक्त शांत झोपायचं आहे. सीबीआय कोठडीतून सुधारगृहात पाठवल्यानंतर त्याने शांतपणे झोपण्यासाठी जास्त वेळ मागितला होता. आता त्याने चायनीजची मागणी केली, ती पूर्ण झाली नाही.
बलात्कार आणि हत्या प्रकरणात किती आरोपी आहेत हे शोधण्यासाठी सीबीआय दिल्ली एम्सच्या तज्ज्ञांची मदत घेणार आहे. मुख्य आरोपी संजय रॉय हा एकटाच आरोपी आहे की, गुन्ह्यात आणखी काही आरोपी आहेत, हे डीएनए आणि फॉरेन्सिक रिपोर्टवरून तपासले जाईल. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.