कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. शिक्षक दिनानिमित्त ट्रेनी डॉक्टरच्या आईने एक पत्र लिहून तिच्या आयुष्यातील सर्व शिक्षकांचे आभार मानले आहेत आणि न्यायाच्या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजाचा पाठिंबा मागितला आहे. त्यांनी पत्रात लिहिलं आहे की...
"मी तिलोत्तमाची आई आहे,
आज शिक्षक दिनी, माझ्या मुलीच्या वतीने मी तिच्या सर्व शिक्षकांना सलाम करते. लहानपणापासून डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. त्या स्वप्नामागची प्रेरक शक्ती तुम्ही होतात. आम्ही पालक म्हणून तिच्यासोबत आहोत. तिने स्वतः खूप मेहनत घेतली होती.
पण मला वाटतं, तिला तुमच्यासारखे चांगले शिक्षक मिळाल्यामुळे ती तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकली. मग पदवी मिळाली, माझी मुलगी म्हणायची, आई, मला पैशांची गरज नाही. मला फक्त माझ्या नावासमोर खूप पदव्या हव्या आहेत आणि मी इतक्या रुग्णांना बरं करू शकते का?
एक आई म्हणून सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक, डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, नर्सिंग स्टाफ यांना नम्र विनंती, तुमच्याकडे काही माहिती व पुरावे असतील तर कृपया समोर आणा. कारण मला असं वाटतं की काही चांगल्या लोकांचं मौन गुन्हेगारांना प्रोत्साहन देतं. मेडिकल सोसायटी आणि सर्वसामान्य लोकांच्या आंदोलनासोबत उभं राहण्याचा मेसेज देत आहे व माझ्या मुलीला न्याय मिळावा, अशी अपेक्षा असलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सलाम.
तिलोत्तमाची आई"
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर हा छापा टाकण्यात येत आहे. CBI ने RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष आणि इतर तिघांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली होती.