पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराला ९० दिवस पूर्ण होत असताना ज्युनिअर डॉक्टर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. याप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही किंवा राज्य सरकारनेही दोषींवर कठोर कारवाई केली नसल्याचं ज्युनिअर डॉक्टरांचं म्हणणं आहे.
सिव्हिल राइट्स एक्टिव्हिस्ट अनुराग मैत्री यांनीही या आंदोलनात सहभाग घेत या विषयावर गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की आरजी कर मेडिकल कॉलेजमधील क्रूरतेनंतर, राज्य सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी पावले उचलली गेली नाहीत. या विरोधात आम्ही न्यायाची मागणी करत असून महिलांवरील बलात्कार आणि हत्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. आता हा प्रश्न केवळ डॉक्टरांचाच नाही तर संपूर्ण समाजाचा प्रश्न बनला आहे.
ज्युनिअर डॉक्टरांचा संघर्ष सुरूच
ट्रेनी डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं ज्युनिअर डॉक्टर राजदीप यांनी सांगितलं. घटनेला ९० दिवस उलटले आहेत. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने या मुद्द्यावर तात्काळ कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून पुन्हा असा गुन्हा करण्याचा विचारही कोणी करू नये, असं म्हटलं आहे.
न्याय हवा आहे
याप्रकरणी सातत्याने न्यायाची मागणी करत आहोत, मात्र तीन महिने उलटूनही ठोस कारवाई झालेली नाही, असं आंदोलन करणाऱ्या एका महिलेने सांगितलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.