कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या फार्मसी विभागात आज सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयामधून सुमारे 250 रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त प्राप्त झालेले नाही.
कोलकातामधील रुग्णालयात भीषण आग, 250 रुग्णांना वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 10:11 IST