कोलकाता पोलिस आयुक्त (Kolkata Police) विनीत गोयल यांनी शुक्रवारी प्रसिद्ध गायक केके (Krishnakumar Kunnuth-KK) यांच्या मृत्यूसंदर्भात महत्त्वाचं स्पष्टीकरण दिले. बुधवारी त्यांचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी जागेची कमतरता नव्हती आणि तेथे एसीही योग्यरित्या सुरू होता, असं गोयल म्हणाले. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी आणि गरज भासल्यास आपत्कालीन वैद्यकीय मदत देण्यासाठी पोलीस काही उपाययोजना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“कार्यक्रमाच्या स्थळी काही प्रमाणात गर्दी असू शकते, परंतु जागेची कमतरता होती किंवा त्यांना घाम येत आहे किंवा (इतर) लोकांना त्रास होत होता अशी कोणतीही परिस्थिती नव्हती," असं गोयल यांनी स्पष्ट केले. केके त्यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी ६.२२ वाजता पोहोचले आणि 7.05 वाजता ते मंचावर पोहोचले. त्यांच्या जवळ गर्दीही जमा नाही, त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते," असंही त्यांनी सांगितलं.
मात्र, त्यावेळी कार्यक्रमस्थळी किती लोक होते, यावरून वाद निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.”पोलिसांकडे स्पष्ट व्हिडिओ आहे जिथे तुम्ही लोक आरामात उभे राहून नाचताना पाहू शकता. त्याठिकाणी कोणत्याही वेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती नव्हती आणि जेव्हा कार्यक्रमाचा व्हिडीओ वेगवेगळ्या अँगलमधून पाहिला गेला तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी जागाही उपलब्ध होती," असं ते म्हणाले.