शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Kolkata Rape Murder Case : आधी शवविच्छेदन, नंतर एफआयआर; कोलकाता प्रकरणात पोलिसांच्या गंभीर चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 9:17 PM

Kolkata Rape Murder Case : कोलकाता येथील एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत.

Kolkata Rape Murder Case :  काही दिवसापूर्वी कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेत पोलिसांनी कारवाईला उशीर केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आता या प्रकरणी मोठे खुलासे होत आहेत आधी शवविच्छेदन झाले आणि नंतर एफआयआर नोंदवला असल्याचं समोर आले आहे. कोलकाता येथील एका कनिष्ठ डॉक्टरचा मृतदेह सकाळी ६ वाजता सापडला आणि दुपारी ४ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. रात्री ८.३० वाजता मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आणि त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास या प्रकरणी पहिल्यांदाच बलात्कार आणि खुनाचा एफआयआर नोंदवण्यात आला.

CM Eknath Shinde : 'लाडकी बहीण योजनेनंतर आता 'आमचा लाडका शेतकरी योजना' राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जेव्हा पोलिसांना अनैसर्गिक मृत्यू किंवा असामान्य मृत्यूची माहिती मिळते तेव्हा ते ताबडतोब त्या क्षेत्राच्या न्यायदंडाधिकाऱ्यांना कळवतात आणि पोलिस घटनास्थळी पोहोचतात आणि घटनास्थळी असलेल्या परिस्थितीमुळे गुन्हा घडल्याचे दिसून आल्यास लगेच गुन्हा नोंदवला जातो. पण जर परिस्थिती अशी असेल की हे प्रकरण खून, आत्महत्या किंवा अन्य कारणाने मृत्यू हे ठरवता येत नाही, तर त्या परिस्थितीत निर्णय घेतला जातो.

पण हे हत्येचे प्रकरण असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. हा जघन्य गुन्हा असेल किंवा अपघातात मृत्यू झाला असेल तर या प्रकरणीही गुन्हा दाखल केला जाईल. व घटनास्थळावरील कार्यवाहीबरोबरच दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा तयार करण्यात येतो. सामान्य प्रक्रियेत कोणताही गुन्हा घडला किंवा जघन्य गुन्हा घडला तर त्याची नोंद झाली पाहिजे जेणेकरून उद्या गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी दिरंगाई केली असण्याची शक्यता नाही.

या प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी ए.के. जैन यांनी सांगितले की, हा वाद निर्माण झाला आहे कारण एका डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी शवविच्छेदन केल्यानंतर, कलकत्ता पोलिसांनी अंतिम संस्कारांसाठी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. काही तासांनंतर एफआयआर नोंदवण्यात आला. हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचे लक्षात घेऊन कारवाई सुरू करण्यात आली. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचे मृत डॉक्टरच्या मृतदेहाच्या आणि कपड्यांवरून स्पष्ट झाले होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापकांनी दिलेला एफआयआर पोलिस ठाण्यात प्राप्त झाला, त्यात बारा तासांहून अधिक विलंब झाला आहे. ही मोठी अनियमितता आहे. अशा घटनांमध्ये एफआयआरशिवाय पोस्टमार्टम होत नाही.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे माजी डीसीपी एल.एन. राव म्हणाले की, साधारणपणे मृतदेह पाहून हा खून आहे की अपघात, याचा अंदाज येतो. किंवा स्वतःला दुखापत करून आत्महत्या. शरीराची स्थिती पाहून हे सांगता येईल. घटनास्थळी असलेला IO मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यासोबतच एक फॉर्म भरतो आणि त्यात मृतदेहाची स्थितीही लिहितो. एफआयआर सहसा पहिल्यांदा दाखल केला जातो. 

टॅग्स :Policeपोलिसkolkata-uttar-pcकोलकाता उत्तरCrime Newsगुन्हेगारी