कोलकात्यातील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रकरणावरून पश्चिम बंगालमधील राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना एक पत्र लिहिले. यावरून आता टीएमसी आणि भाजपमध्ये वार-पलटवार सुरू आहे.
पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष सौमित्र खान यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत, हे पत्र म्हणजे नाटकीपणा असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सौमित्र म्हणाले, "एवढा मोठा नाटकीपणा संपूर्ण देशात कुठेही बघायला मिळणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेले पत्र म्हणजे नाटकीपणा आहे."
काय म्हणाले, सौमित्र खान? -सौमित्र खान म्हणाले, 'ममता बंदोपाध्याय या जगातील सर्वात नाटकी नेत्या आहेत.' एढेच नाही तर, आपण बलात्कार पीडितेच्या आईला 10 लाख रुपयांना खरेदी करत आहात, असे म्हणत त्यांनी ममतांवर गंभीर आरोपही केला आहे.
घटनेमागे कोण?ममता बॅनर्जींसोबतच त्यांनी रोहिंग्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "जातीच्या दृष्टीने विचार केल्यास, या सगळ्यांमागे रोहिंग्यांचा हात असल्याचे लक्षात येते. ममता बॅनर्जी यांनी देशासाठी कधीही काहीही चांगले केलेले नाही. त्या आता पश्चिम बंगाल आणि महिलांना उद्ध्वस्त करण्याच्या नादात आहेत. केवळ जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठीच त्यांनी हे पत्र लिहिले आहे."
काय आहे ममतांच्या पत्रात? -पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व तिची हत्या या पार्श्वभूमीवर देशभरात डॉक्टरांनी आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, देशात दरदिवशी बलात्काराच्या 90 टना घडतात. त्यातील बहुतांश पीडितांची हत्या केली जाते. ही अतिशय भीषण स्थिती आहे.
महिला सुरक्षित असाव्यात यासाठी केंद्र सरकारने कडक कायदा करावा. बलात्काराच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत. तसेच या खटल्यांचा 15 वसांत निकाल लावला जावा अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.