शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
5
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
6
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
7
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
8
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
9
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
10
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
11
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
12
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
13
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
14
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
17
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
18
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
19
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट

आरोग्य सेवा कोलमडणार? उद्या IMA चा देशव्यापी संप; कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:31 AM

Kolkata rape-murder : आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

Kolkata rape-murder : नवी दिल्ली : कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत.  इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA)देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळं देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. आयएमएनं एक पत्रक काढून १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं  सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्टला बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 

वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, आयएमएनं म्हटलं आहे की, "कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील क्रूर घटना आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांसोबत झालेल्या गुंडगिरीबाबत आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रविवार म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांच्या सेवा २४ तास बंद ठेवण्याची घोषणा केली."

"सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अपघातग्रस्तांवर उपचार केले जातील. नियमित ओपीडीच्या सेवा नाहीत आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. हा संप सर्व क्षेत्रांना लागू आहे, जेथे मॉडर्न मेडिसिन डॉक्टर आपल्या सेवा देत आहेत. डॉक्टरांच्या प्रश्नावर आयएमएला देशाच्या सहानुभूतीची गरज आहे", असंही एएनआयनं म्हटलं आहे. आतापर्यंत १२ जणांना अटक ९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सीबीआयने गुरुवारी पाच डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले होतं. तसंच, याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप